Eknath Shinde Latest News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरमधील कथित एनआयटी भूखंड प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. साडेचार एकरचा भूखंड खाजगी व्यक्तीला देण्याच्या निर्णयावर नागपूर खंडपीठानं समाधान व्यक्त केलं आहे. (Latest Marathi News)
एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्रीपदी असताना हा भूखंड बिल्डरच्या घशात घातला असा आरोप होत होता. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधिमंडळात घेरण्याचा प्रयत्न देखील केला होता. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री असताना न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात दिली, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर विरोधकांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, आज (22 डिसेंबर) आता या निर्णयावर समाधान व्यक्त करत कोर्टाने शिंदे यांना एकाप्रकारे क्लीन चीटच दिली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे. (Maharashtra Political News)
कोर्टात नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांच्या वकीलांनी आज कोर्टात जोरदार युक्तीवाद केला. या भूखंड संदर्भात न्यायालयात याचिका दाखल याची माहिती NIT च्या अधिकाऱ्यांनी दिली नव्हती. त्यामुळं भूखंड 16 बिल्डर्सला देण्यात आला. मात्र, आता आम्हाला योग्य माहिती मिळाली आहे, त्यामुळं 16 जणांना भूखंड देण्याचे नवीन आदेश आम्ही रद्द करत आहोत. जुना आदेश जो हा भूखंड झोपडपट्टी वासीयांच्या घरकुलासाठी होता तो आम्ही कायम ठेवत आहोत, असं शिंदेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.
नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जनहित याचिकेबाबत एकनाथ शिंदेंना अवगत करून दिले नसल्याने अनावधानाने ही चूक झाल्याचे न्यायालयासमक्ष कबूल करण्यात आले. मुद्दाचा निपटारा झाल्याचे लक्षात घेत न्यायालयाने प्रकरणावरील अर्ज निकाली काढला.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.