जन्म-मृत्यू दाखला मिळणार कधी? पुणेकरांचा संतप्त सवाल

नागरिकांना ऑनलाइन दाखले देण्याची योजना महापालिकेने (Pune Municipal Corporation) आखली आहे.
जन्म-मृत्यू दाखला मिळणार कधी? पुणेकरांचा संतप्त सवाल
जन्म-मृत्यू दाखला मिळणार कधी? पुणेकरांचा संतप्त सवाल Saam Tv
Published On

पुणे: नागरिकांना ऑनलाइन दाखले देण्याची योजना महापालिकेने (Pune Municipal Corporation) आखली आहे. प्रत्यक्षात मात्र जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी हेलपाटेच मारावे लागत असल्याचे आढळून आले आहे. महापालिकेच्या मुख्य जन्म-मृत्यू (Birth and death certificates) नोंदणी कार्यालयामधील अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण त्यासाठी दिले जात आहे. मात्र टेंडर संपून 2 महिने झाले आहेत मनुष्यबळ भरलं गेले नाही त्यामुळे अडचणीला नागरिकाला सामोरं जावं लागत आहे.

महापालिकेच्या हद्दीमध्ये जन्म आणि मृत्यू झाल्यास त्याची नोंदणी कार्यालयामध्ये करून दाखला मिळवणे नागरिकांना अनिवार्य आहे. हा दाखला नसेल, तर नागरिकांची अनेक कामे अडून राहतात. अर्ज करूनही त्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना जन्म आणि मृत्यूचा दाखला वेळेत मिळालेला नाही. त्यासाठी नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयाची वारी करवी लागत होती. या कार्यालयामध्ये दाखल्याची अंतिम औनोंदणी करण्यासाठी पूर्णवेळ एकही लिपिक नाही. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे दाखले तयार करण्यास वेळ लागत आहे.

जन्म-मृत्यू दाखला मिळणार कधी? पुणेकरांचा संतप्त सवाल
भोंदू बाबाला अटक! महिलांना तंत्रा-मंत्रात अडकवून भागवायचा शरिराची भूक

पुढील काही दिवसांत सर्व प्रलंबित दाखले देण्यात येतील. तांत्रिक कारणांमुळे काही अडचणी आल्या होत्या. मात्र, त्या दूर केल्या आहेत. सध्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने मर्यादा येत आहेत. लहान मुलाला घेऊन जन्म दाखल काढण्यासाठी आले आहे. दाखला काढण्यासाठी उद्या या परवा या अशी उत्तरे दिली जातात. प्रत्येक वेळी वेगवेगळी कागदपत्रे मागितले जातात. कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसतात. या संदर्भात उडवा- उडवीची उत्तरे दिली जातात. सर्व कागद असताना ही फक्त इंग्रजी बनवून पाहिजे तरी चक्कर मारावा लागत आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली नाही पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जन्म-मृत्यूचे दाखले दिले जातात मनुष्यबळ आणि टेंडर प्रक्रिया नसल्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय ई-टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी आणि मनुष्यबळ भरलं जावं अशी अपेक्षा पुणेकर करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com