Maharashtra Politics: शरद पवारांनी बोलावलेल्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली? अनिल देशमुखांनी सगळं उलगडूनच सांगितलं

NCP Crisis News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवार मोठा निर्णय घेत आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करणार, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते.
NCP Sharad Pawar Group Meeting
NCP Sharad Pawar Group MeetingSaam TV
Published On

NCP Sharad Pawar Group Meeting in Pune

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (१४ फेब्रुवारी) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पुण्यातील मोदी बागेत महत्वाची बैठक झाली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, रोहित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यादरम्यान, शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NCP Sharad Pawar Group Meeting
RajyaSabha Election 2024 : काँग्रेसकडून राज्यातून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी, चार नावे जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) मोठा निर्णय घेत आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करणार, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या चर्चांचं खंडण केलं आहे. तसेच बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, याबाबत सगळं उलगडून सांगितलं आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

शरद पवार यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीनंतर अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी अनिल देशमुख यांना विचारला. यावर बोलताना देशमुख म्हणाले, "या गोष्टीत काहीही सत्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन चिन्ह मिळावं, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे".

"त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच नाही. बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक, तसेच पक्षाला मिळालेलं नवीन चिन्ह कोणतं असावं, यासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे. लवकर नवीन पक्षचिन्ह मिळालं, तर आम्हाला ते मतदारांपर्यंत पोहचवता येईल", असंही अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितलं आहे. (Latest Marathi News)

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सुद्धा या चर्चांचं खंडण केलं आहे. "लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळं महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणं, एकमेकांशी संवाद करणं झालं तर लगेच राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना काही अर्थ नसतो",

"याबाबत सविस्तर माहिती चर्चेनंतर सुप्रिया सुळे, शरद पवार किंवा जयंत पाटील स्वतः देतील. त्यामुळं याविषयी चर्चा करुन काहीतरी वेगळ्या दिशेनं आपण जायचं मला बरोबर वाटत नाही", असं म्हणत विद्या चव्हाण यांनी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली आहे.

NCP Sharad Pawar Group Meeting
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, नाकातून रक्तस्त्राव अन् बोलताही येईना; डॉक्टरही चिंतेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com