Maharashtra rain Update: अवकाळी संकट! पुण्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका, परिसरात रोगराई पसरण्याचा धोका

Maharashtra Rain update: राज्यात वेस्टर्न डिस्टर्बेंसमुळे हवामानात मोठा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वातावरण बदलामुळे राज्यांमधील गारठा वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही भागात पावसाची शक्यता आहे.
Maarashtra Rain update
Maarashtra Rain updateSaam tv
Published On

Maharashtra Rain:

राज्यात वेस्टर्न डिस्टर्बेंसमुळे हवामानात मोठा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वातावरण बदलामुळे राज्यांमधील गारठा वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान, पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील परिसराला काल शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने झोडपले. पावसामुळे पुणे-नाशिक महामर्गावरील चाकण परिसरात वाहतूक कोंडीही झाली. (Latest Marathi News)

पुण्यासह इतर काही भागात अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, या पावसामुळे कांदा सारख्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे रोगराई पसरण्याचा ही धोका या अवकाळी पावसामुळे होऊ शकतो.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maarashtra Rain update
Gujarat fire: गुजरातमध्ये तेलाच्या कारखान्याला भीषण आग; काही कामगार गंभीर जखमी, 5 अग्निबंब घटनास्थळी

राज्यात उद्या पावसाची शक्यता

महाराष्ट्रात ८ ते ९ तारखेला मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा व्यक्त केला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक उद्धवस्त होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचा अहमदगरला फटका

अहमदनगरमध्ये काल शनिवारी अलकाळी पावसाने हजेरी लावली. अहमदनगरच्या राहुरीत पाऊस पडला आहे.

छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यात पाऊस

शुक्रवारी राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला होता. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती.

अवकाळी पावसामुळे तूर , कांदा, हरभरा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर पावसाने जळगावमध्येही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com