Gujarat fire: गुजरातमध्ये तेलाच्या कारखान्याला भीषण आग; काही कामगार गंभीर जखमी, 5 अग्निबंब घटनास्थळी

Gujarat Sarigam GIDC fire Update: नागपूरमधील बर्फाच्या कारखान्यात सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना ताजी असताना गुजरातमधील सारिगाम जीआयडीसीतील कारखान्यात आग लागल्याची घटना घडली आहे...
Gujarat fire
Gujarat fireSaam tv

Gujarat Sarigam GIDC Fire:

नागपूरमधील बर्फाच्या कारखान्यात सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना ताजी असताना गुजरातमधील एका कारखान्यात आग लागल्याची घटना घडली आहे. पालघरच्या जवळ असलेल्या तेल उत्पादन करणाऱ्या कारखान्याला ही आग लागली आहे.

ऑल केम सॉल्ट असं या कारखान्याचं नाव आहे. गुजरातमधील उंबरगाव जिल्ह्यात ही घटना आहे. या आगीत काही कामगार जखमी झाले आहेत. तर आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या पाचहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या गुजरातच्या उंबरगाव जिल्ह्यात तेल उत्पादन करणाऱ्या ऑल केम सॉल्ट या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन पुरुष आणि दोन महिला कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे.

आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तेलाची कंपनी असल्याने ही आग वाढल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्याला आग नेमकी कशी लागली, याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gujarat fire
Nagpur Factory Blast: नागपुरात बर्फाच्या कारखान्यात सिलिंडरचा स्फोट; काही कामगार जखमी, अग्निशमन दल घटनास्थळी

आग लागल्यानंतर कंपनीत गोंधळ

गुजरातच्या सारीगम जीआयडीसीमधील कंपनीला आग लागली. शनिवारी उशीरा तेल उत्पादन करणाऱ्या कंपनीला आग लागली. ऑल केम सॉल्ट कंपनीला लागलेल्या आगीत कंपनीत एकच गोंधळ उडाला.

कंपनीत काम करणारे तीन पुरुष आणि दोन महिला आगीत होरपळल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आग लागल्यानंतर उंबरगाव, सारीगाम, भिलाड, वापी आणि वापी जीआयडीसी येथील अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com