Kalyan Water Issue: कल्याण- टिटवाळ्यामध्ये मंगळवारी पाणी नाही, 'या' परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Kalyan-Titwala Water Cut: मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या अशुद्ध आणि शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसवण्यात येणार आहे. या कामासाठीच कल्याण आणि टिटवाळ्यात मंगळवारी पाणी येणार नाही.
Kalyan Water Issue: कल्याण- टिटवाळ्यामध्ये मंगळवारी पाणी नाही, 'या' परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद
Mumbai Water SupplySaam Tv
Published On

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याण आणि टिटवाळ्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या मंगळवारी कल्याण आणि टिटवाळ्यामधील अनेक परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मिटर बसवणाच्या कामासाठी तब्बल ९ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे.

उल्हास नदीवरील कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या अशुद्ध आणि शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर मंगळवारी प्रवाह मोजणी मीटर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ९ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मंगळवार सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत या जलवाहिन्यावरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे मंगळवारी २२ एप्रिल रोजी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणारा नाही.

Kalyan Water Issue: कल्याण- टिटवाळ्यामध्ये मंगळवारी पाणी नाही, 'या' परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद
Water Crisis : १५ वर्षांपासून भिषण पाणी टंचाईचा सामना; दूरवरून आणावे लागते पाणी, शिंदी गावातील दोन योजना अपूर्णच

कल्याण ग्रामीण विभाग, मांडा टिटवाळा, वडवली, आंबिवली, अटाळी, शहाड आणि परिसरातील गावे तसेच कल्याण पश्चिम येथील मिलिंद नगर योगिधाम, बिर्ला विद्यालय परिसर, म्हाडा वसाहत, मुरबाड रस्ता परिसर, चिकनघर भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे .

मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन केडीएमसीकडून करण्यात आले आहे.

Kalyan Water Issue: कल्याण- टिटवाळ्यामध्ये मंगळवारी पाणी नाही, 'या' परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद
Mumbai Water : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २४ तास पाणीपुरवठा बंद, पाहा कोणत्या भागांना बसणार फटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com