Mumbai Water : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २४ तास पाणीपुरवठा बंद, पाहा कोणत्या भागांना बसणार फटका

Mumbai water supply shutdown : अमर महल जंक्शनजवळ जलवाहिनी गळतीमुळे मुंबईतील अनेक विभागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एम पूर्व, एम पश्चिम, एन, एल व एफ उत्तर विभागातील भाग प्रभावित. संपूर्ण यादी पाहा.
Water Issue
Water IssueSaam Tv
Published On

Water Supply Disruption In Mumbai : मुंबईवर पाणीबाणीचे मोठं संकट ओढावले आहे. पुढील २४ तास मुंबईतील काही भागात पाणी पुरवठा होणार नाही. मेट्रोचे काम सुरू असताना अमर महल जंक्शन येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीसाठी जलवाहिनी २४ तास बंद करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबईतील एम पूर्व, एम पश्चिम,एन, एल,एफ उत्तर विभागातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर एफ दक्षिण विभागातील काही भागात पाणीपुरवठा अंशत: बंद आहे.

संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा खंडित कालावधीत काटकसरीने पाणी वापर करावा, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

पाणी पुरवठा बंद राहणारा परिसर

१) एम पश्चिम विभाग - (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल)

वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ कॉलनी, लालडोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, अतूर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर, श्यामजीवी नगर, घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, पोस्टर कॉलनी, एस. टी. मार्ग, सी. जी. गिडवाणी रस्ता, उमरशीन बाप्पा चौक, चेंबूर नाका, चेंबूर बाजार, चेंबूर कॅम्प, वाशी गाव, भक्ती पार्क, आंबापाडा, माहूल गाव, म्हाडा बिल्डींग, म्हैसूर कॉलनी, जिजामाता नगर, माहूल रोड, एम. एस. बिल्डींग, राम टेकडी, सिंधी सोसायटी, चेंबूर कॉलनी, कलेक्टर कॉलनी, मारवली चर्च, नवजीवन सोसायटी, बसंत पार्क, युनियन पार्क, चरई व्हिलेज, गोल्प्फ क्लब, व्ही. एन. पुरव मार्ग, आर. सी. मार्ग,

Water Issue
Pune : पुणेकरांच्या कामाची बातमी, रिक्षाप्रमाणे आता कॅबमध्येही मीटर

२) एम पूर्व विभाग - (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल)

अहिल्याबाई होळकर मार्ग, रफिक नगर, बाबा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, ९० फूट रस्ता क्रमांक १३,१४,१५; मंडाला, २० फूट, ३० फूट रस्ता, एकता नगर, म्हाडा इमारती; कमलरामन नगर, बैंगनवाडी मार्ग क्रमांक १०-१३, आदर्श नगर; रमण मामा नगर, शिवाजी नगर रस्ता क्रमांक ०६ ते १०, शास्त्री नगर, चर्च रोड, संजय नगर भाग-२; शिवाजी नगर रस्ता क्रमांक ०१ ते ०६, चर्च रोड; जनता टिंबर मार्ट परिसर, लोटस कॉलनी, अब्दुल हमीद मार्ग; गौतम नगर, गोवंडी स्थानक मार्ग, दत्त नगर, केना बाजार; देवनार महानगरपालिका वसाहत, साठे-नगर, झाकीर हुसेन नगर, लल्लूभाई इमारती; जनकल्याण सोसायटी, मानखुर्द, पी. एम. जी. पी. कॉलनी, डॉ. आंबेडकर नगर, साठे नगर, लल्लूभाई / हिरानंदानी इमारती; जे. जे. मार्ग (ए, बी, आय, एफ क्षेत्र), सी, डी, ई, जी, एच, जे, के क्षेत्र, चिताकॅम्प, कोळीवाडा, पायलीपाडा, ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्तनगर, बालाजी मंदिर मार्ग; देवनार गाव रस्ता, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बी. के. एस. डी. मार्गाजवळील भाग, दूरसंचार कारखाना, बीएआरसी, नेव्हल डॉकयार्डस् मानखुर्द, मंडाला गाव, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव; एसपीपीएल इमारती, महाराष्ट्र नगर, समता चाळ, भीम नगर रहिवाशी संघ, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर; देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी, घाटला, बीएआरसी कारखाना, बीएआरसी कॉलनी, गौतम नगर, पांजरापोळ

Water Issue
Nashik : नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आली, देवेंद्र फडणवीस यांचा रोख कुणाकडे?

३) एन विभाग (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल)

घाटकोपर पूर्वेतील राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगरसह विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, एम. जी. मार्ग, पंतनगर, न्यू पंतनगर, विक्रांत सर्कल, पटेल चौक, आंबेडकर सर्कल, ९० फूट रस्ता, लक्ष्मी नगर, लक्ष्मीबाग, गरोडिया नगर, नायडू कॉलनी, शास्त्रीनगर, गुरुनानक नगर, जवाहर मार्ग, गौरीशंकर मार्ग, रमाबाई नगर, कामराज नगर, नेताजी नगर, चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट मार्ग, एन. एस. एस. मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एस. पथ, खलाई गाव, किरोळ गाव, विद्याविहार पश्चिम, हंसोटी गल्ली, खोत गल्ली, एम. जी. मार्ग, नवरोजी गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, जे. व्ही. मार्ग, ध्रुवराजसिंग गल्ली, गोपाल गल्ली, जीवदया गल्ली, गिगावडी, भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, गुन्हे शाखा परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, सीजीएस कॉलनी, गंगावाडी, एमटीएनएल गल्ली, एजीएलआर मार्ग, एलबीएस मार्गालगतचा परिसर घाटकोपर (पश्चिम) श्रेयस सिग्नल इत्यादी पर्यंत. सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, काम गल्ली, श्रद्धानंद रस्ता, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, एलबीएस मार्ग घाटकोपर (पश्चिम), गांधी नगर शेजारील परिसर.

४) एल विभाग (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल)

नवीन टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला पूर्व मधील नेहरू नगर, मदर डेरी रोड, कसाई वाडा, चुनाभट्टी परिसर, राहुल नगर व एवरार्ड नगर, नेहरू नगर, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, मदर डेअरी मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व), केदारनाथ मंदीर मार्ग, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस वसाहत, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, टिळक नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, स्थानक मार्ग, राहुल नगर, एवरद नगर, पानबाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अलीदादा मार्ग, स्वदेशी जेवण चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडाकोळ प्रेम नगर, हिल रोड, मुक्तता देवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर

५) एफ उत्तर विभाग (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल)

शीव पश्चिम आणि पूर्व, दादर (पूर्व), माटुंगा (पूर्व), वडाळा, चुनाभट्टीचा भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्मेडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, लोढा इमारती (नवीन कफ परेड), शीव कोळीवाडा-सरदार नगर, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबी मिठागर, वडाळा येथील द्वार क्रमांक ०४ आणि ०५, भिमवाडी.

६) एफ दक्षिण विभाग (पाणीपुरवठा अंशत: बंद राहील)

रुग्णालय क्षेत्र: केईएम रुग्णालय, टाटा, बाई जेरबाई वाडिया, एमजीएम रुग्णालय, शिवडी (पूर्व) विभाग- शिवडी किल्ला रस्ता, गडी अड्डा, शिवडी कोळीवाडा, शिवडी (पश्चिम) विभाग- आचार्य दोंदे मार्ग, टी. जे. मार्ग, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद मार्ग, गोलंजी इनपुट, परळ गाव पंप झोन- गं.द. आंबेकर मार्ग ५० सदनिकांपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव रस्ता, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळिंबे मार्ग, एस. पी. कंपाउंड (अंशतः), काळेवाडी झोन- परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी अंशत:, साईबाबा मार्ग, मिंट कॉलनी, राम टेकडी, नायगाव पंप झोन- जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये मंडई, भोईवाडा गाव, हाफकिन इन्स्टिट्यूट, दादर, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी रस्ता, हिंदमाता यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, डॉ. बी.ए.रोड चिवडा गल्ली, डॉ. एस.एस.राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजिभोय मार्ग, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी क्षेत्र, अभ्युदय नगर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com