Maval News : कामशेतमध्ये चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, महिलांचा ग्रामपंचायतीस हंडा मोर्चाचा इशारा

तीव्र उन्हाळा असल्याने नागरिकांना पाण्याची कमतरता जाणवत आहे. पाणीपुरवठा योजनेविषयी ठोस उपाययोजना होत नाही. दुषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे
water scarcity in kamshet near maval
water scarcity in kamshet near maval saam tv
Published On

Maval :

मावळच्या कामशेत शहरात काही भागात चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. तर काही ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शहरातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांसह ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे वारंवार कोलमडत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून अशुद्ध, तर काही ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा होत आहे. गावातील काही भागात चार दिवस पाण्याची वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. पाणीपुरवठा विभागाकडून होणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे पाण्यावर तवंंग येत आहे.

water scarcity in kamshet near maval
Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात, तिघे जखमी; दाेघांची प्रकृती गंभीर

तीव्र उन्हाळा असल्याने नागरिकांना पाण्याची कमतरता जाणवत आहे. पाणीपुरवठा योजनेविषयी ठोस उपाययोजना होत नाही. दुषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Maharashtra News)

दुषित व अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. मात्र दररोज पाणी विकत घेणे परवडणारे नाही. अनेक व्यावसायिक बाटली बंद पाण्याची ज्यादा दर घेऊन नागरिकांची लूट करीत आहेत.

हंडा मोर्चाचा इशारा

त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने दररोज पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाणीपुरवठा सुरळीत आणि शुद्ध न केल्यास ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा घेऊन जाण्याचा इशारा कामशेत मधील महिलांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

water scarcity in kamshet near maval
Malegaon Eid 2024 : सामूहिक नमाजादरम्यान युवकानं फडकावला पॅलेस्टाइनचा झेंडा; मौलानांचा तातडीने खुलासा, पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com