Pune : लघुशंकेसाठी गेला, तिघांनी डोक्यावर बिअरच्या बाटल्या फोडल्या, वारज्यात मध्यरात्री गोंधळ

Warje Pune youth attacked with beer bottle during midnight urination : पुण्यातील वारजे माळवाडीत दारूच्या नशेत तिघांनी लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणावर बिअरच्या बाटल्यांनी हल्ला केला. डोक्यावर व पाठीवर बाटल्या फोडून त्याला गंभीर जखमी करण्यात आलं.
Pachora Crime
Pachora CrimeSaam tv
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Warje Violence: पुण्यामधील वारजे माळवाडीमध्ये दारूच्या नशेत तिघांनी एका तरूणाला बेदम मारल्याची घटना समोर आली आहे. वारजे माळवाडीतील मोकळ्या जागेत दारू पीत बसलेल्या टोळक्याने लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यावर आणि पाठीवर बिअरच्या बाटल्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करत दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. एकजण फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

वारजे माळवाडीमधील एका मोकळ्या जागेत काही जण दारू पीत बसले होते. त्या टोळक्याने लघुशंकेसाठी आलेल्या तरुणावर बिअरच्या बाटल्याने जोरदार हल्ला केला. यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आदित्य मारणे, विकी करंजाळे यांना अटक केली आहे. अजून एका आरोपीचा शोध पोलिस करत आहेत.

Pachora Crime
Pune : चाकण हादरलं! ७ जणांनी महिलेला किडनॅप केलं, खोलीत डांबून बलात्कार केला

ही घटना 9 जूनला मध्यरात्री साडेबारा वाजता वारजे परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी व त्याचा मित्र लघुशंकेसाठी वारजे परिसरात एका ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत गेले होते. याच दरम्यान समोर दारू पिणाऱ्या आरोपींनी त्यांना येथे आमच्यासमोर गोंधळ का करता? तुम्हाला लय मस्ती आली का? असे म्हणत वाद घातला.

Pachora Crime
Delhi Fire : इमारतीला भीषण आग, सातव्या मजल्यावरून २ मुलांसोबत बापाने टाकली उडी

या वादात आरोपी आदित्य मारणे यांनी हातातील बियरची बाटली फिर्यादीच्या कपाळावर फोडून त्याला जखमी केले. यावेळी दुसऱ्या आरोपी विकी करंजाळे यांनी देखील बाटली त्याच्या ओठावर मारली. त्यानंतर दोघांनी छातीवर व तोंडावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.यातील एक आरोपींनी हत्यार हवेत फिरून दहशत निर्माण केली. याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.

Pachora Crime
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याचं टोकाचं पाऊल, गाडीत आढळला मृतदेह, सोलापूरमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com