''मी राज मार्गावरच, पण आता किती नगरसेवक निवडून येतील माहित नाही''

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबतही वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडली आहे, ते म्हणाले...
Vasant More
Vasant MoreSaam TV
Published On

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Manase) अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) साहेबांनी प्रवक्ते दिले आहेत तेच बोलतील मी त्या विषयी काही बोलणार नाही अशी भूमिका मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी घेतली आहे. माझी भूमिका एकला चलो रे असलो तरी मी पक्षातच आहे. माझं उद्दिष्ट पक्ष वाढवणे आणि काम करुन नगरसेवक वाढवणे हेच आहे.

मला शहरात 25 नगरसेवक निवडून आणायचे होते, पण आता ते किती निवडून येतील हे मी सांगू शकत नाही. मात्र मी राज मार्गावरच आहे. असही वसंत मोरे म्हणाले आहेत. अयोध्या दौऱ्याविषयी पुणे शहर पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला मी उपस्तिथ राहणार नाही. मात्र जर राज साहेब पुणे पक्ष कार्यातील बैठकीला हजर राहिले तर मी नक्की उपस्थित राहणार असं वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर पक्षांर्तगत नाराजी सुरु झाली. अनेक मुस्लीम मनसे पदाधिकारी नाराज झाले आणि त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. यादरम्यान चर्चेचा विषय ठरला तो पुणे शहराचे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरेंची भूमिका. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन तर केलेच नाही, परंतु त्यानंतर राज ठाकरे अनेकदा पुण्यात उपस्थीत असताना वसंत मोरे मात्र अनुपस्थीत होते. काही दिवसांपुर्वी वसंत मोरे यांनी महाआरतीचे आयोजन केले होते, त्यावेळी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. सर्वांना वाटलं होते की राज ठाकरे याठिकाणी उपस्थीत राहणार परंतु राज ठाकरें आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com