Truck Drivers Strike: ट्रक चालकांच्या हिंसक आंदोलनप्रकरणी मोठी कारवाई; ४० जण ताब्यात

Mumbai News: नवीन मोटार वाहन कायद्याला वाहन चालकांचा मोठा विरोध पाहायला मिळत आहे. या कायद्यावर आक्षेप नोंदवत ट्रक चालकांनी चोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.
Truck Drivers Strike
Truck Drivers StrikeSaam Digital
Published On

सिद्धेश म्हात्रे, मुंबई|ता. १ जानेवारी २०२४

Navi Mumbai News:

नवीन मोटार वाहन कायद्याला वाहन चालकांचा मोठा विरोध पाहायला मिळत आहे. या कायद्यावर आक्षेप नोंदवत ट्रक चालकांनी सोमवारी (१, जानेवारी) सकाळच्या सुमारास चिंचोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

या आंदोलनाला वसईमध्ये हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनकर्त्यांना बाजूला करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या हिंसक आंदोलनाप्रकरणी आता ४० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षांची शिक्षा या नव्या कायद्या विरोधात ट्रक चालक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. आज (१, जानेवारी) नवी मुंबईत उरण, कळंबोली, उलवे याठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. या आंदोलनाने जेएनपिटी मार्गावर हिंसक वळण घेतल्याचे पहायला मिळाले.

उलवे येथील सिमेंट कंपनी जवळ उभ्या असलेल्या ट्रक चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आंदोलनकर्त्या ट्रक चालकांनी पोलिसांवरच हल्ला चढवत लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Truck Drivers Strike
Rohit Pawar News: आमदार रोहित पवार लोकसभेच्या रिंगणात; प्रफुल्ल पटेलांना आव्हान देणार? जिल्हाध्यक्षांचा मोठा दावा

या हिंसक आंदोलन प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करुन 40 आंदोलनकर्त्या ट्रक चालकांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत असून यापुढे ट्रक चालकांनी आंदोलन करताना शांततेत करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले आहे. (Latest Marathi News)

Truck Drivers Strike
Parbhani News : प्रहारचा दिव्यांगांच्या मागण्यांसाठी मोर्चा, पूर्णा- ताडकळस महामार्ग रोखून धरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com