Kolhapur Protest: हप्ता वसुली गुंडांच्या हल्ल्यात स्वीट मार्ट चालकाचा मृत्यू, नागरिकांचा मृतदेहासह कोल्हापुरात रास्ता रोको

Kolhapur Protest News: कोल्हापूरमधील राजारामपुरीत परप्रांतीय स्वीट मार्ट चालकाने हप्ता देण्यास नकार दिल्याने गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. हल्ल्यात स्वीट मार्ट चालकाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू झाला आहे.
Kolhapur Protest
Kolhapur ProtestSaam Digital
Published On

Kolhapur Protest

कोल्हापूरमधील राजारामपुरीत परप्रांतीय स्वीट मार्ट चालकाने हप्ता देण्यास नकार दिल्याने गुडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. हल्ल्यात स्वीट मार्ट चालकाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू झाला असून संतप्त नागरिकांनी उद्यमनगर येथे मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला. हप्तेखोर गुंडांच्या विरोधात तक्रार देऊनही कारवाई न करता राजारामपुरी पोलिसांनी हल्लेखोरांना पाठीशी घातल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजारामपुरीत परप्रांतीय स्वीट मार्ट चालकाकडे काही गुंड हप्ता वसुलीसाठी गेले होते. मात्र स्वीट मार्ट चालकाने हप्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे गुडांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर गुंडांनी तेथून पळ काढला. स्वीट मार्टचालकाला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृ्त्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kolhapur Protest
Truck Drivers Strike: ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, नवी मुंबईत पोलिसांना मारहाण

याप्रकरणी राजाराम पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत आज नागरिकांनी उद्दमनगर येथे रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थी येऊन नागरिकांचं म्हणणं ऐकूण घेतलं आणि कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

Kolhapur Protest
Kalyan New Year News: नववर्षाच्या पहाटे कल्याण डोंबिवलीत 5880 जणांवर कारवाई, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना पोलिसांचा दणका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com