Vasai News : १५ दिवस उलटूनही वसई किल्ल्यातील बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश; नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण

Vasai Leopard News : ऐतिहासिक वसई किल्ल्यात बिबट्याचा वावर असल्याने येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. पंधरा दिवस उलटूनही वनविभाग या बिबट्याला जेरबंद करण्यात अपयशी ठरलं आहे.
Vasai News
Vasai News Saam Digital

ऐतिहासिक वसई किल्ल्यात बिबट्याचा वावर असल्याने येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. पंधरा दिवस उलटूनही वनविभाग या बिबट्याला जेरबंद करण्यात अपयशी ठरल्याने ग्रामस्थांच्या संतापात भर पडली आहे. त्यामुळे वसई किल्ल्यातील ग्रामस्थांची खासदार राजेंद्र गावित यांनी भेट घेतली वनविभागाला ग्रामस्थांच्या तक्रारीचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या.

पंधरा दिवस उलटूनही बिबट्याला पकडण्यात आलेलं नाही, त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातली धाकधूक वाढली आहे. ग्रामस्थांच्या मनातील भीती कशी कमी करता येईल, यासाठी बिबट्याला पकडणे किती गरजेचं आहे, याची जाणीव वनविभागाच्या अधिकाऱ्यांना करून दिली. या बिबट्याला शोधण्यासाठी आणखी एक तुकडी तैनात करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

वसई किल्ला परिसरात जवळपास १५ दिवसांपूर्वी अपघातात बिबट्या जखमी झाला आहे. त्यामुळे भागात बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं असून परिसरात दहशतीचं वातावरण आह. वनविभाग आणि वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेमार्फत बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.

Vasai News
Dhule Accident News : बाभळे फाटानजीक मालवाहू वाहनास अपघात, 15 वर्षाची मुलगी ठार; 25 जण जखमी

वसई किल्ला प्रवेशद्वार ते जेट्टीला जोडणाऱ्या रस्त्यावर फिरत असलेल्या बिबट्याला एका दुचाकी स्वाराने धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वाराने तेथून पळ काढला. त्याच्या गाडीची तुटलेली नंबरप्लेट घटनास्थळावरून वनविभागाच्या हाती लागली आहे. याचबरोबर या संपूर्ण घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी वसई किल्ल्यामध्ये वन विभागाने अनेक कॅमेरे लावण्यात आले. त्यामध्ये बिबट्या कैद झालेला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

Vasai News
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिवशी मेगाब्लॉक रद्द करा; ठाकरे गटाची रेल्वेकडे मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com