महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या शिवाजी पार्कवर आंबेडकरी अनुयायांचा महासागर उसळणार आहे. मात्र दोन्ही लोकल रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक नियोजित करण्यात आला आहे. त्यामुळे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी जनतेची गैरसोय होणार आहे. याची दखल घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी रेल्वेकडे केली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या शहरातील पुणे स्टेशन,अरोरा टॉवर कॅम्प, विश्रांतवाडी आणि दांडेकर पूल परिसरात नागरिक अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे.हा बदल आज सायंकाळी सात वाजल्यापासून उद्या रात्री दोन वाजेपर्यंत राहील. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असं आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी केलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी रविवार (ता. 14) अमरावती शहरात मिरवणूका, उत्सव आदी बाबी लक्षात घेता अमरावती शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलिस आयुक्त कल्पना बारवकर यांनी दिली. हा बदल केवळ एक दिवसापूरता असेल असेही बारवकर यांनी नमूद केले.
अमरावती मधील इर्विन चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक 14 एप्रिलला पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाेलिसांनी इतर मार्गाने वळविली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पाेलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.