Mumbai News : खुशखबर! वसई-भाईंदर प्रवास अवघ्या 15 मिनिटांत, रो रो सेवचा मार्ग प्रवाशांसाठी उद्यापासून सुरु

RoRo Service : वसई - भाईंदर रो-रो जेट्टीच्या अपुऱ्या कामामुळे अनेक वर्षांपासून काम रखडले होते. अशातच वसईकरांसाठी खुशखबर आहे. जेट्टीचे काम पूर्ण झाले असून उद्यापासून अर्थात मंगळवारपासून ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.
RO RO Service in Vasai Bhayandar
RO RO Service in Vasai BhayandarSaam Tv
Published On

RO RO Service in Vasai Bhayandar, Mumbai:

वसई - भाईंदर रो-रो जेट्टीच्या अपुऱ्या कामामुळे अनेक वर्षांपासून काम रखडले होते. अशातच वसईकरांसाठी खुशखबर आहे. जेट्टीचे काम (Work) पूर्ण झाले असून उद्यापासून अर्थात मंगळवारपासून ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.

वसई-भाईंदरमधील वाहतुकीच्या कोंडीमुळे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे ही जेट्टी सेवा सुरु करण्यात येत आहे. ही सेवा (Service) वसईपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर असणार आहे. त्यामुळे कमी वेळेत अंतर कापता येईल. ही रो रो जेट्टी सेवा वसई येथील किल्लाबंदर ते भाईंदर दरम्यान राबवण्यात येईल. याचे उद्घाटन केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते होणार आहे.

RO RO Service in Vasai Bhayandar
Maruti SkyDrive : भारतात लवकरच हवेत उडणार कार; मारुती सुझुकी इलेक्ट्रिक 'एअरकॉप्टर' बाजारात आणण्याच्या तयारीत

वसई विरारकर येथील नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून हा जेट्टीचा मार्ग निवडण्यात आला आहे. तसेच या सेवेचे जबाबदारी सुवर्णदुर्ग या खासगी कंपनीला देण्यात आली आहे.

रो रो या फेरीबोटीची क्षमता 33 वाहनांसोबत 100 प्रवाशांची असणार आहे. या फेरीबोटीला केंद्र सरकारच्या 'सागरमाला योजने' तून परवानगी मिळालेली आहे.

RO RO Service in Vasai Bhayandar
Upcoming Cars: जबरदस्त स्टाईल आणि पॉवरफुल इंजिन; यावर्षी भारतात लॉन्च होणार या कार्स, पाहा लिस्ट

रो रो फेरीबोटींचे तिकिटांची किंमत

  • मोटारसायकल - 60 रुपये

  • तीन चाकी रिक्षा - 100 रुपये

  • कार - 180 रुपये

  • मासे, पक्षी, कोंबडी, फळे इ. (प्रति टोपली) व कुत्रा, शेळी, मेंढी (प्रति नग) - 40 रुपये

  • प्रवासी (12 वर्षांवरील) - 30 रुपये

  • लहान मुले (3 ते 12 वर्षांपर्यंत)- 15 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com