Vaishnavi Hagawane Case Updates
Vaishnavi Hagawane Case UpdatesX

वैष्णवीचे सासरे-दीर यांना लपण्यासाठी आश्रय देणाऱ्यांवर कारवाई, आरोपींमध्ये काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाचा समावेश

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार होते. त्यांना लपवण्यासाठी मदत करणाऱ्या पाचजणांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Published on

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Vaishnavi Hagawane News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना फरार होण्यास मदत करणाऱ्या, त्यांना लपण्यासाठी आश्रय देणाऱ्या पाच आरोपींनी पिंपरी चिंचवड शहरातील बानधन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Vaishnavi Hagawane Case Updates
MP: आणखी एक 'निर्भया'! प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड अन्...; गर्भाशय शरीराबाहेर आढळलं, नराधमांचं महिलेसोबत अमानवी कृत्य

सासरी होणाऱ्या छळाला, सततच्या हुंड्याच्या मागणीला वैष्णवी त्रासली होती. तिच्या पतीने, शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय ठेवला होता. या सगळ्या गोष्टींना कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचा म्हटले जात आहे. पण तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण पाहायला मिळाले असल्याने वैष्णवीची हत्या झाल्याचे तिचे आईवडील म्हणत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद यांना अटक केली होती. तिचा सासरा आणि दीर फरार होते. शोधमोहिमेनंतर त्या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली.

Vaishnavi Hagawane Case Updates
हायवेवर महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणारा नेता मनोहरलाल धाकडला जामीन, अटकेच्या दुसऱ्याच दिवशी सुटका

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे जेव्हा फरार होते, तेव्हा त्यांना लपण्यासाठी काहीजणांनी मदत केली होती. या प्रकरणी मोहन उर्फ बंडू उत्तम भेंगडे (६० वर्ष), बंडू लक्ष्मण पाठक (५५ वर्ष), अमोल विजय जाधव (३५ वर्ष), राहुल दशरथ जाधव (४५ वर्ष) आणि प्रीतम वीरकुमार पाटील (४७ वर्ष) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील प्रीतम पाटील हा काँग्रेसचे माजी आमदार वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे.

Vaishnavi Hagawane Case Updates
Crime : ५० पेक्षा जास्त तरुणींवर अत्याचार, ३ हजारांहून अधिक...; वासनेने पेटलेला ट्रॅक्सी ड्रायव्हर अखेर कसा पकडला गेला?

यादरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना न्यायालयासमोर हजर केले. त्यांना २८ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवीच्या अंगावर असलेले व्रण ज्या हत्यारामुळे आले, ज्या हत्याराने तिला मारहाण झाली; त्या हत्याराचा शोध अजूनही सुरु आहे. हे हत्यार कुठे लपवून ठेवले आहे, याचा शोध पोलीस करत आहेत.

Vaishnavi Hagawane Case Updates
स्कूटीवरून आला; लेकीसमोर आईला KISS करुन पळाला, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com