
उत्तन-विरार सागरी मार्गाच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएने सादर केलेल्या उत्तन-विरार सागरी मार्ग प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली. या सागरी सेतूला ८७ हजार कोटी खर्चाची मंजुरी मिळाली होती. पण आता या प्रकल्पासाठी ५२ हजार कोटी खर्चाच्या किफायतशीर पर्यायास पसंती देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या सर्वात कमी खर्चाच्या पर्यायाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला.
उत्तन-विरार सागरी सेतू हा प्रकल्प वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. या सागरी सेतूमुळे मुंबईला उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत जलद मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम मार्ग मिळणार आहे. या सागरी सेतूच्या माध्यमातून वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वेशी थेट जोडणी होणार असून त्यामुळे हा प्रोजेक्ट केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न राहता भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टीकोनालाही बळकटी देणारा ठरणार आहे.
या प्रोजेक्टसाठी सादर करण्यात आलेल्या ६ पर्यायांमध्ये पर्यावरणपूरक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि यंत्रसामुग्रीच्या दृष्टीने कार्यक्षम पर्यायाची निवड करण्यात आली आहे. या पर्यायांमुळे सुमारे ३४,७७५ कोटींची बचत शक्य झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या अनुषंगाने निधी संकल्पनाही स्पष्ट करण्यात आली असून एकूण प्रोजेक्ट खर्चातील ३७,९९८ कोटी रक्कम जायका (JICA) किंवा अन्य बहुपक्षीय निधीकडून टोल वसुलीच्या आधारे परतफेडीच्या स्वरुपात प्रस्तावित आहे.
तर उर्वरित १४,६५४ कोटी भांडवली स्वरूपात महाराष्ट्र सरकार किंवा एमएमआरडीएकडून उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएला सुधारित आणि अद्ययावत तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) आणि प्राथमिक प्रकल्प अहवाल (PPR) शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
- लेन डिझाइन बदल - ४ + ४ लेनऐवजी ३ + ३ लेन, कनेक्टरसाठी २ + २ लेन; यामुळे सिव्हिल कामांमध्ये बचत होणार आहे.
- स्मार्ट नियोजन - भविष्यातील रस्ते-जोडण्या आणि विद्यमान रस्ते लक्षात घेऊन गरजेपुरते बजेट ठरवले आहे.
- जमीन अधिग्रहणात बचत - लेन रुंदी कमी केल्यामुळे जागेची गरज कमी लागेल. त्यामुळे अधिग्रहण आणि भरपाई खर्च कमी होईल.
- कनेक्टर रचना सुधारणा - पूर्वी दोन खांबांवर रचना होती. आता एका खांबावर बांधकाम खर्च आणि पर्यावरणीय परिणाम कमी होईल.
- एकूण लांबी - ५५.१२ किमी
- मुख्य सागरी मार्ग - २४.३५ किमी
- कनेक्टर्स - ३०.७७ किमी
- उत्तन कनेक्टर (९.३२ किमी) – बृहन्मुंबई महापालिकेच्या दहिसर-भाईंदर लिंक रोडशी जोड
- वसई कनेक्टर (२.५ किमी) - पूर्णपणे उन्नत
- विरार कनेक्टर (१८.९५ किमी) - वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेला जोडणारा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.