महिलेनं मसाजसाठी घरी थेरपिस्टला बोलावलं, अचानक सुरू झालं 'दे दणादण', VIDEO व्हायरल

Urban Company Massage Therapist Assault Case In Mumbai: मुंबईच्या वडाळा परिसरात अर्बन कंपनीच्या मसाज थेरपिस्टकडून महिलेला मारहाण झाल्याचा आरोप आहे. बुकिंग रद्द केल्याने झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिस तपास सुरू आहे.
Police investigation underway after a woman alleged assault by an Urban Company massage therapist in Mumbai’s Wadala area.
Police investigation underway after a woman alleged assault by an Urban Company massage therapist in Mumbai’s Wadala area.Saam Tv
Published On
Summary
  • • वडाळ्यात अर्बन कंपनीच्या मसाज थेरपिस्टवर महिलेला मारहाण केल्याचा आरोप
    • बुकिंग रद्द केल्याने वाद वाढल्याचा पीडितेचा दावा
    • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
    • पोलिसांकडून एनसी दाखल, तपास सुरू
    • ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या पार्श्वभूमी तपासणीवर प्रश्नचिन्ह

मुंबईच्या वडाळा परिसरात ऑनलाईन सेवा देणाऱ्या अर्बन कंपनीच्या एका मसाज थेरपिस्टकडून महिलेला मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बुकिंग रद्द केल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या थेरपिस्टने शिवीगाळ करत हाणामारी केल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून खळबळ उडाली आहे.

पीडित महिला 46 वर्षांची असून तिने फ्रोजन शोल्डरच्या उपचारासाठी अर्बन कंपनीमार्फत मसाज सेवा बुक केली होती. मात्र, थेरपिस्टच्या वागणुकीमुळे अस्वस्थ झाल्याने तिने सेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला. याच कारणावरून थेरपिस्ट चिडली आणि पीडित महिलेशी वाद घालत शिवीगाळ व हातापाई केल्याचा आरोप आहे.

Police investigation underway after a woman alleged assault by an Urban Company massage therapist in Mumbai’s Wadala area.
Satara Crime: अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून शेततळ्यात फेकले; गर्लफ्रेंडने नवऱ्याच्या मदतीने केलं भयंकर कृत्य

घटनेदरम्यान पीडितेने तात्काळ पोलिसांना फोन केला. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत संबंधित थेरपिस्ट पळून गेल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी एनसी (नोंद न होणारा गुन्हा) दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमी तपासणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणात अर्बन कंपनीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com