Nitin Gadkari stuck in Pune traffic during site visit : देशभरात प्रशस्त रस्त्यांचे जाळे विणणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरीच (Union Minister Nitin Gadkari) वाहतूक कोंडीमध्ये अडकले. नितीन गडकरी यांना पुण्याच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गडकरी यांची गाडी पुढे जात नसल्याचे बघून पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पण पुण्यातील वाहतूक कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे मंत्री नितीन गडकरी यांना आपला पाहणी दौरा रद्द करावा लागला. गडकरी यंनी गाडीत बसूनच अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. (Transport-Minister-Nitin-Gadkari-stuck-in-a-traffic-jam)
पुण्यातील शनिवार वाडा ते स्वारगेट या भुयारी मार्गासाठी भुयारी मार्ग व्हावा यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला होता. नितीन गडकरी हे शनिवार वाडा येथे पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. पण रस्त्यावर अचानक वाहतूक कोंडी झाली. लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे मंत्री गडकरी यांची गाडी वाहतूक कोंडीमध्ये अडकली. ट्रॅफिक जॅम जाल्यामुळे नितीन गडकरींनी पाहणी दौरा रद्द केलाय. नितीन गडकरी यांच्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील वाहतूक कोंडी राज्यात चर्चेत आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही बसला आहे. सोमवारी शनिवार वाडा ते स्वारगेट दरम्यान प्रस्तावित असलेल्या भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा होता. मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांना पाहणीच्या ठिकाणापर्यंत पोहोचता आलं नाही. शेवटी गडकरींनी दौरा रद्द करून गाडीत बसूनच अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
स्थानिक आमदार रासने यांनी मात्र या वाहतूक कोंडीला पोलीस आणि स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटलेय. पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्यात योग्य समन्वय न झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी साम टीव्हीसोबत बोलताना सांगितले. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचे निवेदन देऊन लवकरच यासंदर्भात बैठक घेऊ असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं आहे, अशी माहितीही हेमंत रासने यांनी दिली आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.