रश्मी पुराणिक
मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांवरील ED ची कारवाई भाजपा राजकारणातील अंडरवर्ल्ड डॉन झाला आहे, हे पुन्हा दर्शवते. पूर्वी डॉन जागा बळकावण्यासाठी गुंड पाठवायचे. मोदी सरकार सत्ता बळकावण्यासाठी तपास यंत्रणा पाठवते. २०१४ ते २२ मध्ये ED ने २९७४ धाडी उगीच टाकल्या नाहीत. यात एकही भाजपाचा नाही.
खरे तर भाजप अध्यक्षांची आधी चौकशी झाली पाहिजे. वाधवानकडून २० कोटी देणगी कशी मिळाली? हा काळा पैसा नाही? आधुनिक दुर्योधन व दुःशासन लोकशाहीचे वस्त्रहरण करताना संविधानिक संस्था भीष्माचार्य व द्रोणाचार्याप्रमाणे साथ देत आहेत. धृतराष्ट्राप्रमाणे कायदेव्यवस्था वागते हे देशाचे दुर्दैव आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नातेवाईकावर कारवाई केली आहे. ईडीने ठाकरेंच्या मेहुण्याची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
हे देखील पहा-
ईडीने ठाण्यात आज सकाळी मोठी कारवाई केली. ठाण्यातील 'नीलांबरी' प्रकल्पातील ११ सदनिका हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या आहेत. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. यापूर्वी मनी लाँडरींगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज याच मालमत्तेवर ईडीने कारवाई केल्याची माहिती आहे.
यापूर्वीही किरीट सोमय्यांनी पाटणकरांवर केले होते आरोप -
कर्जत येथील वैजनाथ देवस्थान येथील जमिनीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी गेल्या जानेवारी महिन्यात केला होता. ''वैजनाथ येथील शंकराचे देवस्थान प्रसिद्ध आहे. अशा या देवस्थानची जमीन गैरव्यवहार करून एका सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर केली. त्यानंतर ती जमीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या नावावर करण्यात आली'', असे गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केले होते.
भाजपकडून ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप -
आतापर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर तपास यंत्रणांची कारवाई झाली. ईडी कारवाईमुळे महाविकास आघाडीतील एक मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊतांच्या निकटवर्तीयांची देखील ईडीने चौकशी केली. त्यामुळे ईडी राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.