Accident in Ulhasnagar: भरधाव कारने ५ ते ६ वाहनांना उडवलं; उल्हासनगरमधील भीषण अपघाताचा VIDEO समोर

Ulhasnagar Accident Video: उल्हासनगरमधील अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. या भयानक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
 Ulhasnagar Car Accident Video
Ulhasnagar Car Accident Video Saam TV
Published On

Ulhasnagar Car Accident Video

उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर महामार्गावर रविवारी (१७ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. मद्यधुंद कारचालकाने रिक्षासह ६ ते ७ वाहनांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. या भयानक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Ulhasnagar Car Accident Video
Corona Alert: कोरोना पुन्हा पसरतोय, गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला; केंद्राच्या राज्यांना महत्वाच्या सूचना

अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज (Accident Video) पाहून अनेकांना धडकी भरली आहे. सुमोदित जाना, अंजली जाना आणि शंभू चव्हाण अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक लवेश केवलरामानी (वय २२) याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहू शकता रस्त्यावरून काही वाहने जाताना दिसत आहे. याचवेळी एक भरधाव कार येते आणि प्रवासी रिक्षाला जोरदार धडक देते. रिक्षाला उडवल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अन्य वाहनांना देखील कारची जोरदार धडक बसते. या अपघातात रिक्षासह कारचा चक्काचूर झाल्याचं दिसून येतंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक लवेश केवलरामानी हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. शांतीनगर परिसरात (Ulhasnagar News) कार आली असता, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच कारने समोरून जात असलेल्या रिक्षासह ४ वाहनांना जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com