Uddhav Thackeray: आमचं सरकार सत्तेत आल्यावर 'त्या' पोलिसांवर कारवाई करणार; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

Uddhav Thackeray on Mulund Shiv Sena BJP clash : आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही त्या पोलिसांना बघून घेऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. विक्रोळी येथील जाहीर सभेतून ठाकरेंना हा इशारा दिला आहे.
Uddhav Thackeray on Mulund Shiv Sena BJP clash
Uddhav Thackeray on Mulund Shiv Sena BJP clashSaam TV
Published On

मुंबईतील लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसं राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे. शुक्रवारी मुलुंड येथे भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. भाजपकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला.

यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या ५ कार्यकर्त्यांना अटक देखील केली आहे. मात्र, पोलीस हे सुडबुद्धीने आमच्यावर कारवाई करत असल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray on Mulund Shiv Sena BJP clash
Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

पोलिसांकडून आपल्याला मारहाण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही त्या पोलिसांना बघून घेऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. विक्रोळी येथील जाहीर सभेतून ठाकरेंना हा इशारा दिला आहे. याशिवाय ठाकरेंनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आव्हान केलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

विक्रोळीतील जाहीर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, "काल मुलंडमध्ये आपल्या शिवसैनिकांनी जी धाड टाकली. त्याच्यामध्ये पोलिसांनी आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं. इतकंच नाही, तर त्यांनी शिवसैनिकांना बेदम मारहाण केली. माझी शिवसैनिकांना विनंती आहे, की मला त्या पोलिसांची नावे द्या. आपलं सरकार आल्यावर मी त्यांना बघतोच", असं ठाकरेंनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मला पोलिसांनाही सांगायचं आहे की तुम्ही भाजप किंवा फडणवीसांचे नोकर नाही आहात. तुम्ही जनतेचे सेवक आहात. उद्या आमचं सरकार सत्तेत आल्यावर तुमचं काय करायचं तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही. हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय", असंही ठाकरे म्हणाले.

"उद्धव ठाकरेंच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही"

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान हे राखणं महाराष्ट्राचं कर्तव्य आहे. पोलीस जेव्हा कारवाई करतात, तेव्हा अशा पद्धतीची धमकीची भाषा याअगोदर मुंबईत असणारे तस्कर आणि गुंड द्यायचे. पण माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून अशी भाषा शोभत नाही".

"जर आपल्याला वाटत असेल की पोलीस चुकले असं वाटत असेल, तर कोर्टामध्ये वकिलांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडता येते. पण अशा पद्धतीने धमकी देणं हा पूर्ण महाराष्ट्राच्या पोलीस विभागाचा अवमान आहे. आपण कधीच मुख्यमंत्री होणार नाही. याची जाण ठेवणं त्यांना गरजेचं आहे. कारण काँग्रेस आणि शरद पवार पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही", असंही मुनगंटीवर म्हणाले.

Uddhav Thackeray on Mulund Shiv Sena BJP clash
Mumbai News : ठाकरे गटाला भाजप उमेदवाराच्या कार्यलयाबाहेरील राडा भोवला, मुलुंडमधील 5 शिवसैनिकांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com