Mumbai News : ठाकरे गटाला भाजप उमेदवाराच्या कार्यलयाबाहेरील राडा भोवला, मुलुंडमधील 5 शिवसैनिकांना अटक

Mumbai Mulund Political News: मुलुंडमध्ये भाजप आणि ठाकरे कार्यकर्ते भिडले होते. या प्रकरणी आज पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. त्यांनंतर या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
मुलुंडमधील 5 शिवसैनिकांना अटक
Mumbai Mulund News :Saam tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईतील ईशान्य मुंबईतील निवडणूक भाजप आणि ठाकरे गटाने प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेला दोन दिवस बाकी असताना, ठाकरे गटाने मुलुंडमध्ये शुक्रवारी भाजप वॉररुममध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजप आणि ठाकरे कार्यकर्ते भिडले होते. या प्रकरणी आज पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. त्यांनंतर या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

मुलुंडमधील ठाकरे गटाने ईशान्य मुंबईतील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या वॉर रुममध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले. त्यांनी कोटेचा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शुक्रवारी पैसे वाटपाच्या आरोपावरून शिवसैनिकांनी कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

मुलुंडमधील 5 शिवसैनिकांना अटक
Mulund BJP News | पैसे वाटल्याचा आरोप, भाजप आणि ठाकरे गटाचा राडा

मुलुंडमधील या राड्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आयोगाने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात पाच शिवसैनिकांना अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि दंगल माजवल्या प्रकरणी अटक केली आहे.

मुलुंडमधील 5 शिवसैनिकांना अटक
Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

संजय राऊत यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. 'काल मुलुंडमध्ये पैसे वाटप करत असताना आम्ही त्यांना पकडून दिले. मात्र त्यांना बचाव करण्यासाठी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आले. काळा पैसा पकडून दिला तर आमच्यावरच कारवाई केली, असा आरोप राऊतांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com