निवृत्ती बाबर
Uddhav Thackeray News: 'मला अर्धवटराव म्हणत असतील तर ते आवडाबाई आहेत का? आवडाबाई म्हणायला तेही आता दिल्लीश्वरांना आवडत नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला. (Latest Marathi News)
ठाकरे गटाने काल षण्मुखानंद सभागृहात शिवसेना वर्धापन दिन साजरा केला. या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'अर्धवटराव हे पात्र कोणाचं आहे सर्वांना माहिती नाही. मला अर्धवटराव म्हणत असतील तर ते आवडाबाई आहेत का? आवडाबाई म्हणायला तेही आता दिल्लीश्वरांना आवडत नाहीत.पण फडणवीस आता नावडाबाई झालेत'.
इतिहास काढून काही उपयोग नाही : उद्धव ठाकरे
यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे औरंगाजेबाच्या कबरीवर भेट दिली. त्याच्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'जेव्हा आमची युती भाजपसोबत होती, तेव्हा लालकृष्ण अडवाणी सुद्धा जिनाच्या कबरीवर गेले होते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तान पंतप्रधानच्या वाढदिवसाला गेले होते. त्यामुळे इतिहास काढून काही उपयोग नाही. आता पुढे जायला हवं.
'समान नागरी कायदा प्रत्येक गोष्टीत समान हवा. महिलांना शिव्या देणारे मंत्री होत आहेत, पण महिलांना मंत्रिपद मिळत नाही', असेही ठाकरे म्हणाले.
ठाकरे गट मोर्चा काढणार
पावसप्रमाणे निवडणुका सुद्धा लांबणीवर जात आहेत. लोकांची कामे करायची कशी ? असा प्रश्न पडतोय. पैसा उधळला जातोय, वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मुंबईला मायबाप कोणी राहिली नाही. या भ्रष्टाचाराविरोधात मुंबई महापालिकेवर 1 जुलैला मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
'अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही... असो, आता ऐका...याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला ...म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला ! ' अशा आशयाचे ट्विट फडणवीस यांनी केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.