मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठाकरे गटाने सुरु केली आहे. ठाकरे गटाकडून मुंबईतील रंग शारदा येथे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. 'एक तर तू राहशील, नाहीतर मी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला.
मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पारंपारिक गड राखल्यासाठी आभार... निवडणुकीत प्रचंड बारकाईने काम शिवसैनिकांनी केले. घराघरात शिवसैनिक पोहोचला. पाठपुरावा केला. मतदान करत नाही तोपर्यंत पाठ सोडली नाही.
जे काम पदवीधरमध्ये शिवसैनिकांनी काम केलं, ते आता विधानसभेला करायचे आहे. गटप्रमुख यांच्या हातात ३५० घरे आहेत. त्यांनी ओळखावे कोण शिवसेनाला आपल्याला मत देणार आहे. मतदार यादी चेक करा, त्यांची नावे आहेत का ते पाहा.
९ तारखेपर्यंत मतदार नोंदणी होणार आहे. २ तारखेला ड्राफ्ट प्रसिद्ध होणार आहे. ती यादी २ तारखेला सर्व गटप्रमुखापर्यंत गेली पाहिजे. नावे नसतील तर शाखप्रमुखांकडे द्या आणि शाखप्रमुख निवडणूक आयोगाकडे जाईल.
भगव्या पट्यातून आपल्या शिवसैनिकांची नावे गाळली जाऊ शकतात. SRA कामे चालू आहेत. तिथे नावे चेक करा. तिथे आपले मतदार जास्त आहेत. तिथेच नावे गळली जाण्याची शक्यता आहे. सप्लीमेंट्रीमध्ये हवी ती नावे घालता येतात आणि वगळता येतात. त्यात विरोधकांनी लक्ष ठेवले. त्यात आक्षेप नसतात.
ज्या भगव्यावर धनुष्यबाण आहे, तिथे मशाल दिसली पाहिजे. लवकरच निकाल लागेल. आमची सुप्रीम कोर्टावर श्रद्धा आहे. मला माझा शिवसेना नाव पाहिजे. जे मला मिळणार हा विश्वास आहे.
ज्यांना जायचे उघड जा. पण आत राहून दगाबाजी करू नका. जे सोबत राहतील, त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखवेन. माझे नगरसेवक जात आहे, आताच जा. एकतर तुम्ही राहा, नाहीतर मी...
मला यातना होत नसतील का? अनिल देशमुख यांनी सांगितलं की, कसे आम्हाला अडचणीत ठेवण्याचा प्रयत्न केला. एक तर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.