कितीही अफझल खान आले तरी घाबरणार नाही, विजय आपलाच आहे; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा

उद्धव ठाकरे यांनी कोर्टातील सुनावणीवर भाष्य केलं आहे. आई भवानीच्या आशीर्वादाने विजय आपलाच होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
ही मदत म्हणजे सर्व थरांतील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न
ही मदत म्हणजे सर्व थरांतील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न Saam tv news
Published On

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींवर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज महासुनावणी सुरु आहे. शिवसेना नक्की कुणाची? या ऐतिहासिक पेचावर सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ निर्णय देणार आहेत. या दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोर्टातील सुनावणीवर भाष्य केलं आहे. आई भवानीच्या आशीर्वादाने विजय आपलाच होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

ही मदत म्हणजे सर्व थरांतील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न
Sanjay Raut: संजय राऊतांच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

आताचं जे वातावरण आहे ते भारावून टाकणारं आहे. आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कितीही अफझल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही. माझा आई भवानी आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे. आई भवानीचा आशीर्वाद आपल्यावर आहेच, शिवाय कोण खरं कोण खोटं हे देखील दाखवून दिलं आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

ही मदत म्हणजे सर्व थरांतील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न
एकनाथ शिंदे कोणत्या हक्काने निवडणूक आयोगाकडे गेले? सुप्रीम कोर्टाची विचारणा

सध्या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. ज्यांना तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले. मला रोज अनेक फोन येत आहेत, कुठेही काही आपलं नुकसान झालेलं नाही. ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीत आलो तेव्हापासून शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. जर शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यापैकी शिवसेनेवर हक्क कुणाचा यावर ऐतिहासिक सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. धनुष्यबाण कुणाचं, याचा निकाल आज तातडीने लागेल याची शक्यता कमी आहे. मात्र आज होणारे युक्तीवाद महत्वाचे ठरणार आहे. देशातील दिग्गज कायदेतज्ज्ञ दोन्ही बाजून युक्तीवाद करत आहेत. त्यामुळे अनेक आज काय होणार याकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com