VIDEO: गद्दारांसाठी पक्षाची दारे बंद! शिंदे, अजितदादांसाठी परतीचे दोर कापले; ठाकरे आणि पवारांची भूमिका

MVA Press Conference: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच पक्ष सोडून गेलेल्यांसाठी परतीचे दोर कापल्याचं ठाकरे आणि पवारांनी स्पष्ट केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बंडखोरांसाठी हा इशाराच आहे.
गद्दारांसाठी पक्षाची दारे बंद! शिंदे, अजितदादांसाठी परतीचे दोर कापले; ठाकरे आणि पवारांची भूमिका
MVA Press ConferenceSaam Tv

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा राजकीय संघर्ष होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फुटल्यानं मतदारांचा कौल कोणाकडे असणार याची उत्सुकता होती. गद्दार, निष्ठावंत हा मुद्दाही महत्वाचा होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

मविआला ३० जागा मिळाल्यानं विधानसभेसाठी आघाडीतील तीनही पक्ष एकजुटीनं पुढे सरसावले आहेत. शनिवारच्या मविआच्या संयुक्त पत्रकार परीषदेत त्याची प्रचिती आली. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का? या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजिबात घेणार नाही.

गद्दारांसाठी पक्षाची दारे बंद! शिंदे, अजितदादांसाठी परतीचे दोर कापले; ठाकरे आणि पवारांची भूमिका
VIDEO: मराठा आरक्षणासाठी भाजपचा मेगा प्लॅन? आमदारांना सूचना, आदेश आणि अलर्ट

एकीकडे उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसाठी परतीची दारं बंद असल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आम्ही दार उघडा असं सांगितलेलं नाही, असं प्रत्युत्तर दिलंय.

लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दहा उमेदवार उभे करुन आठ जागा जिंकल्यात. सर्वात जास्त स्ट्राईक रेट पवारांचा असताना अजित पवारांच्या वाट्याला केवळ एक विजय आलाय. पवारांनीही गेलेल्या लोकांना परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले आहे.

गद्दारांसाठी पक्षाची दारे बंद! शिंदे, अजितदादांसाठी परतीचे दोर कापले; ठाकरे आणि पवारांची भूमिका
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेलच्या किंमती वाढणार? कर्नाटकात इंधनाच्या दरात 3 रुपयांनी वाढ

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची व्यक्त केलेल्या या मतांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परतीचे दोर कापले गेले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोर आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. मविआची वज्रमुठ आणि लोकसभेत मिळालेलं ताजं यश पाहता महायुतीसमोर मोठं आव्हान असणार आहे. आगामी विधानसभाही निष्ठा आणि गद्दार भोवती फिरणार असं चित्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com