कॅबिनेट मंत्राचा OSD आमदार होणार? उदय सामंतांचा विश्वासू शिलेदार विधान परिषदेच्या रिंगणात

Uday Samant OSD Sachin Sanap : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे OSD सचिन सानप यांनी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी TDFकडे उमेदवारीची मुलाखत दिली आहे. अधिकृत उमेदवाराची घोषणा लवकरच होणार आहे.
Uday Samant OSD Sachin Sanap
Uday Samant OSD Sachin SanapSaam TV
Published On

Sachin Sanap, Uday Samant OSD : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) सचिन सानप हे आता थेट विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आगामी पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या (TDF) वतीने आयोजित मुलाखतींमध्ये सचिन सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत मुलाखत दिली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून "अजून एका मंत्राचा OSD आमदार होणार का?" अशा चर्चांना उधाण आले आहे.

स्वतः प्राध्यापक असणारे आणि शिक्षक संघटनांच्या माध्यमातून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सातत्याने मांडणारे नेतृत्व म्हणून सचिन सानप यांची पुणे आणि परिसरात ख्याती आहे. शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा ही भूमिका घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं प्राध्यपक सचिन सानप यांनी सांगितले,

शिक्षकांमध्ये आमदारांविरोधात मोठी नाराजी

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयंत आजगावकर यांच्या कारभारावर शिक्षक संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्‍या ६ वर्षांत जुनी पेन्शन योजना, संच मान्यता, अशैक्षणिक कामांचा बोजा आणि शिक्षकांचे मूलभूत प्रश्न सुटू शकलेले नाहीत, असा गंभीर आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षण क्षेत्राशी थेट जोडलेल्या आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची धमक असलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी देण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.

Uday Samant OSD Sachin Sanap
मोठी बातमी! खासगी कोचिंग क्लासेसबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ५ तासांपेक्षा जास्त क्लास घेतला तर...

सचिन सानप यांचे शिक्षक संघटनांमध्ये मोठे जाळे

सचिन सानप यांनी गेल्या काही वर्षांत पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून शिक्षक संघटनांमध्ये त्यांचे मजबूत जाळे निर्माण झाले आहे. शिक्षकांशी असलेल्या थेट संपर्कामुळे आणि प्रशासकीय अनुभवामुळे त्यांची उमेदवारी मजबूत मानली जात आहे. काल पुण्यात टीडीएफ (TDF) संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये सचिन सानप (पुणे), निळकंठ लिंगे (सोलापूर), कौस्तुभ गावडे (कोल्हापूर) आणि आर. एस. पाटील (सांगली) या प्रमुख इच्छुकांनी आपल्या मुलाखती दिल्या आहेत.

Uday Samant OSD Sachin Sanap
मोठी बातमी! खासगी कोचिंग क्लासेसबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ५ तासांपेक्षा जास्त क्लास घेतला तर...

उमेदवारी कोणाला मिळणार? सर्व उत्सुकता शिगेला

पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाचही जिल्ह्यांतून अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. संघटनेशी असलेली बांधिलकी, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि मतदार संघातील संपर्क लक्षात घेऊन येत्या ३ ते ४ दिवसांत टीडीएफ (TDF) आपला अधिकृत उमेदवार जाहीर करणार आहे. त्यामुळे शिक्षक संघटनेची लॉटरी नक्की कोणाला लागते, याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com