Pune News: पुण्यात सिनेस्टाईल थरार, भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Pune Crime News: पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकावर अज्ञात आरोपींनी दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, बंदुकीतून गोळी फायर न झाल्याने आरोपींचा हा प्रयत्न फसलाय.
Pune Firing News
Pune Firing News Saam TV

नितीन पाटणकर, साम टीव्ही पुणे

Pune Firing News

मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भररस्त्यावर गोळीबाराच्या घटना घडत आहेत. पुण्यात तर गुन्हेगारीने कळस गाठला आहे. एकीकडे पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे पुण्यात मंगळवारी (ता.१६) सायंकाळच्या सुमारास एक थरारक घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

Pune Firing News
Salman Khans Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी सापडले, दोघांना गुजरातमधून अटक

पुण्यात (Pune News) एका बांधकाम व्यावसायिकावर अज्ञात आरोपींनी दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, बंदुकीतून गोळी फायर न झाल्याने आरोपींचा हा प्रयत्न फसलाय. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झालाय.

या घटनेमुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. धीरज दिनेशचंद्र आरगडे असं गोळीबारातून बचावलेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धीरज हे शहरातील जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या वन प्लस शोरूमजवळ उभे होते. (Latest Marathi News)

त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरुन तिथे आले. हल्लेखोरांनी फूड डिलिव्हरी बॉयसारखे कपडे घातले होते. याशिवाय त्यांनी हेल्मेट देखील घातलं होतं. शोरुमजवळ उभ्या असलेल्या धीरज यांच्यावर हल्लेखोरांनी दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदुकीतून गोळी न सुटल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.

त्यामुळे धीरज हे जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. आरडाओरड झाल्याने आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. या घटनेनंतर धीरज आरगडे यांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे.

Pune Firing News
Mumbai Fire News: मालाडमध्ये ८ मजली इमारतीला भीषण आग; १४ जण घुसमटले, तिघांची प्रकृती चिंताजनक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com