Yerwada jail: येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी, २ जण गंभीर जखमी

Pune Crime News : येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या दोन गटामध्ये वाद झाला. या वादानंतर यो दान्ही गटातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.
Yerwada jail Clashesh
Yerwada jail ClasheshSaam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

Yerwada jail Clashesh : पुण्यातल्या येरवडा कारागृहातील (Yerwada jail) कैद्यांच्या हाणामारीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कैद्यांच्या दोन गटामध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा कैद्यांच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीमध्ये दोन कैदी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yerwada jail Clashesh
Mumbai News : आधारला मतदान कार्ड लिंक करताना उघड झाला धक्कादायक प्रकार; पोलिसात गुन्हा दाखल

येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या दोन गटामध्ये वाद झाला. या वादानंतर यो दान्ही गटातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. प्लास्टिक बकटे, भाजी वाढण्याच्या वरगळीच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली. या हाणामारीमध्ये न्यायालयीन कैदी हरीराम गणेश पांचाळ आणि मुसा अबू शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कैद्यांच्या दोन गटातील हाणामारीची ही घटना ३१ मार्च रोजी सकाळी पावणेदहा वाजता घडली. येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक २च्या जवळील हौदाजवळ ही हाणामारी झाली. या प्रकरणी कारागृह शिपायाने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Yerwada jail Clashesh
Badlapur News : धक्कादायक! इमारतीचं काम सुरु; वरच्या मजल्यावरून पडलेली सळई तरुणाच्या शरीरातून आरपार

या प्रकरणी येरवडा पोलिसांनी न्यायालयीन कैदी अर्जुन बाजीराव वाघमोडे, रोहन रामोजी शिंदे, साहील लक्ष्मण म्हेत्रे, ऋषिकेश हनुमंत गडकर, ओंकार नारायण गाडेकर, मंगेश शकील सय्यद यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या न्यायालयीन कैद्यांचे हरीराम पांचाळ आणि मुसा अबू शेख यांच्याशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुनच या कैद्यांनी दोघांना बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com