Pune Accident News: पुण्यात भरधाव ट्रकने महाविद्यालयीन तरूणांना चिरडले, 2 जणांचा जागीच मृत्यू

Pune Truck Bike Accident: पुण्यातील नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका येते एक भीषण अपघाताची घडली आहे. ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पुण्यात भरधाव ट्रकने महाविद्यालयीन तरूणांना चिरडले, 2 जणांचा जागीच मृत्यू
Pune Accident NewsSaam Tv

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

पुण्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका येथे सोमवारी रात्री घडली. दुचाकीवरील दोघे ट्रकखाली सापडल्यानंतरही चालकाने ट्रक तसाच पुढे घेत त्यांना फरफटत नेले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

शामबाबू रामफल गौतम (३५, हडपसर), असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, आदिल मजहर शेख (२०, रा . अहमदपूर, लातूर), फहाद गोहर गुलाम असकर शेख (२०, रा. औसा, लातूर) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अफान शौकत शेख (२०, रा. उदगीर, लातूर) याने फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री सवादहाच्या सुमारास नगर रस्त्यावरील खराडी येथील वाघेश्वर पार्किंग समोर ही घटना घडली. घटनेत फिर्यादी अफान हा देखील जखमी झाला आहे.

पुण्यात भरधाव ट्रकने महाविद्यालयीन तरूणांना चिरडले, 2 जणांचा जागीच मृत्यू
Kirti Vyas Case: कीर्ती व्यास हत्या प्रकरणात दोन्ही सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री फिर्यादी अफान आणि त्याचे मित्र आदिल, फहाद हे तिघेजण एका दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने येत होते. ते आदिल याला पुणे स्टेशन येथे सोडण्यासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी जकात नाका येथे सिग्नलवर थांबली असता पाठीमागून वाघोलीहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जड मालवाहतूक ट्रकने त्यांना धडक दिली. त्यावेळी दुचाकीवरील तिघेजण खाली पडले.

पुण्यात भरधाव ट्रकने महाविद्यालयीन तरूणांना चिरडले, 2 जणांचा जागीच मृत्यू
CM Eknath Shinde : CM एकनाथ शिंदेंनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; NDRF, SDRF च्या बैठकीत काय झाली चर्चा?

यातील आदिल आणि फहाद हे ट्रक खाली सापडले. यावेळी फिर्यादी आणि इतरांनी आरडाओरड करूनही ट्रक चालकाने ट्रक पुढे घेतला. यामुळे फरफटत गेल्याने आदिल आणि फहाद यांचा मृत्यू झाला. तर, फिर्यादी अफान जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने ट्रकचालकाला अटक केली आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com