Truck Drivers Strike Called off : संप मिटला... एपीएमसीत भाज्यांची आवक घटली, दर तेजीत (पाहा व्हिडिओ)

तूर्तास कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला.
truck drivers strike affected apmc market vegetables price high in mumbai
truck drivers strike affected apmc market vegetables price high in mumbai saam tv
Published On

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

नवा हिट अँड रन कायद्यातील (New Hit And Run Law) तरतूदींची अंमलबजावणी तूर्तास लांबणीवर पडली आहे. त्याबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केल्याने वाहतुकदारांनी (truck driver strike) मंगळवारी रात्री संप मागे घेतल्याचे जाहीर केले. दरम्यान या संपाचा फटक वाशी येथील एपीएमसी मार्केटला (apmc market) बसला आहे. गेल्या दाेन दिवसांत येथे भाजीपाल्यांची आवक घटली आहे. परिणामी मुंबईतील भाजीपाल्याच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. (Maharashtra News)

केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारले होते. ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आले. ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत तूर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला.

truck drivers strike affected apmc market vegetables price high in mumbai
Satara : पालकमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य पाेलिसांनी घेतले गांभीर्याने, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गाेळीबार करणा-या युवकांची काढली वरात

ट्रक चालकांनी या निर्णयाचे स्वागत करत आपला संप मागे घेतला. रात्री उशिरा संप मागे घेतला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मात्र आपला भाजीपाला एपीएमसी बाजारात पाठवला नसल्याने आवक मोठ्या प्रमाणावर घसरली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एपीएमसीत मंगळवारी दीडशे ते दोनशे ट्रक आले नव्हते. आजही तशीच परिस्थिती दिसून आली. दरम्यान भाजीपाल्यांची आवक घटल्याने दर 30 ते 40 टक्क्यांनी वधारलेचे चित्र एपीएमसीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

truck drivers strike affected apmc market vegetables price high in mumbai
Success Story : जाधव कुटुंबियांच्या प्रयत्नांना यश, सेंद्रिय स्ट्रॉबेरीला मिळू लागला प्रति किलो चारशे रुपये भाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com