Pune DCM Ajit Pawar : पुण्यातील वाहतूककोंडी पाहायची आहे? मनोहर पर्रिकरांसारखे तुम्हीही शहरात फिरा, अजित पवारांना महिलेचा सल्ला

Pune News : पुण्यातील मुंढवा-केशवनगर वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी एका महिलेने त्यांना मनोहर पर्रिकरांसारखे वेळ न सांगता फिरा असा सल्ला दिला.
Pune DCM Ajit Pawar : पुण्यातील वाहतूककोंडी पाहायची आहे? मनोहर पर्रिकरांसारखे तुम्हीही शहरात फिरा, अजित पवारांना महिलेचा सल्ला
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • हडपसरमधील मुंढवा-केशवनगर वाहतूक कोंडीवर अजित पवारांची पाहणी

  • महिलेचा थेट सल्ला: “मनोहर पर्रिकरांसारखे वेळ न सांगता फिरा”

  • सिग्नल दुरुस्ती, अतिरिक्त पोलीस, पाणीपुरवठा आणि दारू विक्रीवर अजित पवारांचे आदेश

  • नागरिकांना दिलासा मिळेल का? प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लक्ष

पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या काही नवीन नाही. विशेषतः मुंढवा-केशवनगर परिसरातील रस्त्यांवर दररोज सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आज सकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री यांनी हडपसर येथील विकासकामांची पाहणी करण्यासाठी गेले असता. सामान्य नागरिकांपैकी असलेल्या एका महिलेने त्यांना थेट गोव्याच्या मंत्र्यांचा आदर्श घ्यायला सांगितला. तसेच ट्रॅफिक संदर्भात माहिती नाही अस होऊ शकत नाही. तुम्ही पण कधीतरी माहिती न देता फिरा असेही त्या म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी पुणे जिल्ह्यातील हडपसर मधील मुंढवा परिसरात केशवनगर पूल पाहणी करण्यास गेले असता. तिथे उपस्थित एका महिलेने त्यांना वाहतूक कोंडीची समस्या सांगितली. तसेच त्या म्हणाल्या, “मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा. वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे खरी परिस्थिती कळेल. तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही सांगणार हा उपाय नाही. कधीतरी माहिती न देता तुम्हीच चौकात या, म्हणजे कोंडीची खरी समस्या तुम्हालाच दिसेल.”

Pune DCM Ajit Pawar : पुण्यातील वाहतूककोंडी पाहायची आहे? मनोहर पर्रिकरांसारखे तुम्हीही शहरात फिरा, अजित पवारांना महिलेचा सल्ला
Ajit Pawar : आधी IPS अंजना कृष्णा यांना फोनवरून झापलं, आता ट्विटमधून अजितदादांनी विषयच संपवला, म्हणाले- माझा उद्देश...

यावेळी महिलेने पर्रिकरांचं नाव घेतल्यावर अजित पवारांनी “पर्रिकर कोण?” असं विचारलं असता त्यावर महिलेनं उत्तर दिलं, “गोव्याचे मिनिस्टर.” दरम्यान वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी मुंढवा चौकात वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा केली. या भागात सिग्नल व्यवस्था नीट कार्यरत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सिग्नल यंत्रणा सुरळीत करण्याचे आदेश दिले. तसेच, गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्याचे निर्देश दिले.

Pune DCM Ajit Pawar : पुण्यातील वाहतूककोंडी पाहायची आहे? मनोहर पर्रिकरांसारखे तुम्हीही शहरात फिरा, अजित पवारांना महिलेचा सल्ला
Ajit Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? अजित पवारांचे महत्वाचे विधान चर्चेत

इतकेच नव्हे तर केशवनगरमधील पाणी व्यवस्था, अवैद्यरित्या सुरु असलेल्या दारू विक्रीचा प्रश्न, तसेच नागरिकांच्या इतर समस्यांचे निवारण करण्यासाठी आज अजित पवार हडपसर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी बिल्डर, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, वाहतूक अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. या पाहणीनंतर मुंढवा-केशवनगर परिसरातील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. आता अजित पवारांच्या सूचनांनंतर प्रशासन आणि वाहतूक विभाग कोणती पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com