जानेवारीत जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता.
अजित पवारांचे स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं विधान.
कोर्टातील प्रक्रियेमुळे निवडणुका उशिरा झाल्याचे स्पष्टीकरण.
कार्यकर्त्यांना चांगले काम करण्याचे आवाहन.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लवकरच निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीची कधी घोषणा होणार याची सर्वजण वाट पाहत आहेत.अशामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वाची बातमी दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा लाबंणीवर गेल्या का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
पुण्यातील गणेश कला क्रीडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. पंचायत राज संस्थांना सक्षम, गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांसह मान्यवर उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विधान केले.
अजित पवार यांनी सांगितले की, 'काही निवडणूका जानेवारी महिन्यात जातील. कदाचित याचा अधिकार निवडणूक आयोगाला असणार आहे. जिल्हा परिषद निवडणुका होऊन जानेवारीत नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे.' तसंच, 'याचा फायदा तुम्हाला निवडणुकीत होईल. त्यामुळे चांगलं काम करा. आधीच निवडणूका होण्याची गरज होती. मात्र निवडणूका का लांबल्यात हे तुम्हाला माहिती आहे. कोर्टात हे सर्व सुरु होते. महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्याचा पंचायतराजमध्ये पहिला नंबर आणा.', असे आवाहन अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
अजित पवारांनी पुढे असे देखील सांगितले की, 'आमच्यासोबत प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे सरकारला जनतेला विकास करून द्यायचा आहे. वेगवेगळे प्रसंग उद्भवतात शांतपणे सामोपचाऱ्यांनी कसा काढता येईल प्रयत्न केला जातो. मुंबईमध्ये मराठा आरक्षण झालेल्या आंदोलनामध्ये काही जण राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. कमी संख्या आहे त्यामुळे आपले काही होईल का बघत होते. आता दिले तर आता गप्प गार बसले आहेत. मिडियामध्ये जाऊन बोलत होते आता दिले तरी चर्चा सुरू आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.