Nandurbar Politics : नंदुरबार जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का; महिला जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Nandurbar News : दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवकांसह ११७ शिवसैनिकांनी केलेला भारतीय जनता पार्टीत प्रवेश आणि आज शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि १३४ कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीत अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. नंदुरबार तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. 

नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता जोरदार घडामोडी सुरु झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. स्थानिक पातळीवरील काही पदाधिकारी पक्षाची साथ सोडून अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. यात नंदुरबार जिल्ह्यात मागील आठवड्यात मोठ्या घडामोडी सुरु झाल्या असून दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

Nandurbar News
Ambajogai News : अंबाजोगाईच्या तरुणाने बनवली 'सायबर बंधू' वेबसाइट; गैरवापराला बसणार आळा

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला धक्का 

यातच शहादा तालुक्यातील शरद पवारांची राष्ट्रवादीला भाजपने मोठा धक्का दिला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुळाताई पाडवी यांच्यासह अनेक आजी- माजी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केले आहे. या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. 

Nandurbar News
Girna Dam : गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग; गिरणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

भाजपला मोठा फायदा 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज बुधवारी नंदुरबार येथील भाजपा जिल्हा कार्यालय विजयपर्व येथे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यामुळे भाजपला मोठा फायदा होणार आहे. तसेच जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादीला याच्या फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com