भीषण अपघात! भरधाव पिकअप टेम्पोनं महिलेला चिरडलं; घटना सीसीटीव्हीत कैद, टिटवाळा हादरलं

Speeding Pickup Crushes Woman Near Ghotsai Phata: टिटवाळा–गोवेली रस्त्यावर घोटसई फाट्याजवळ भरधाव वेगात आलेल्या पिकअप टेम्पोने पायी चालणाऱ्या महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Speeding Pickup Crushes Woman Near Ghotsai Phata
Speeding Pickup Crushes Woman Near Ghotsai PhataSaam
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही

टिटवाळा - गोवेली रस्ता परिसरातील घोटसई फाट्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव पिकअप टेम्पोने महिलेला चिरडले. महिला फाट्याजवळून जात होती. यादरम्यान, भरधाव पिकअप टेम्पोने महिलेला चिरडले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये हा अपघात नेमका कसा घडला? हे स्पष्टपणे दिसून येत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुरेखा खंडागळे असे मृत महिलेचं नाव आहे. त्या टिटवाळा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. हा भीषण अपघात टिटवाळा–गोवेली रस्ता जवळील घोटसई फाट्याजवळ घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा खंडागळे या रस्त्याने पायी जात असताना अचानक वेगात आलेल्या पिकअप टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली.

Speeding Pickup Crushes Woman Near Ghotsai Phata
बलात्कार अन् प्रायव्हेट पार्टमध्ये कापडाचे तुकडे... क्रूर बॉयफ्रेंडनं विवाहित महिलेला छळलं, शेवटी तिनं आयुष्य संपवलं

धडकेनंतर महिला रस्त्यावर पडली असताना टेम्पो त्यांच्या अंगावरून गेल्याने हा अपघात अत्यंत भीषण ठरला. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओमध्ये अपघाताची थरारक दृश्ये स्पष्टपणे दिसत आहेत. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

Speeding Pickup Crushes Woman Near Ghotsai Phata
राज्यात मुलांना पळवल्या जातायेत; ३० टक्क्यांनी प्रमाण वाढले, राज ठाकरेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे चिंता व्यक्त

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पिकअप टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या मार्गावरून भरधाव वाहने चालवली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, स्थानिक नागरिकांनी वेगमर्यादा, स्पीड ब्रेकर आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com