Crime News: संतापजनक! लग्नाचा तगादा लावला, प्रियकराने विवाहित प्रेयसीची 35 वार करत केली हत्या

श्रद्धा हत्याकांडाने देशभरात खळबळ माजली असतानाच टिटवाळ्यात मित्राच्या मदतीने प्रियकराने ३५ वार करत विवाहित प्रेयसीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Crime News
Crime NewsSaamTv
Published On: 

Titwala: दिल्लीमधील श्रध्दा वालकर हत्याकांडांने संपूर्ण देशात खळबळ माजली असतानाच टिटवाळा भागात अशीच भीषण हत्येची घटना उघडकीस आली आहे. लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने मित्राच्या मदतीने तरुणीवर ३५ वार करत भीषण हत्या केली. या घटनेने खळबळ माजली आहे. (Titwala News)

Crime News
Vishwas Patil: 'मालिकेत स्वराज्यरक्षक शब्द म्हणजे अमोल कोल्हेंची चलाखी', ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची जोरदार टीका; फेसबूक पोस्ट व्हायरल

याबाबत अधिक माहिती अशी की, टिटवाळा गोविल परिसरात १२ डिसेंबर रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेची ३५ वार करत हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. या संबंधित घटनेचा पोलिसांनी अधिक तपास केला असता या भीषण हत्येचा उलघडा झाला आहे. पोलिसांच्या तपासात आलेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधांतून लग्नासाठी वारंवार तगादा लावल्याने या महिलेची तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने ३५ वार करत हत्या केली.

Crime News
Beed News: खळबळजनक! घराला चिकटवले धमकीचे पत्र; काय आहे हा सगळा प्रकार?

मृत महिला रुपांजली जाधव ही पुणे येथील रहिवासी असून, टिटवाळ्यात तिचा मृतदेह आढळला होता. यावेळी आधार कार्डच्या सहाय्याने तिची पोलिसांनी ओळख पटवली. त्यानंतर तिची हत्या करणारा प्रियकर जयराज चौरेसह त्याचा मित्र सूरज घाटे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. मृतदेहाशेजारी सापडलेल्या आधार कार्डवरुन तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधत पोलिसांनी या घटनेचा तपास केला. ( Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com