Nalasopara: रेल्वे स्थानकातून दिवसाढवळ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण; घटनेमुळे खळबळ

नालासोपारा रेल्वे स्थानकमधील फलाट क्रमांक ४ वरती एक चिमुकला खेळत होता.
Nalasopara Railway Station
Nalasopara Railway StationSaam TV
Published On: 

नालासोपारा: नालासोपारा रेल्वे स्थानकातून (Nalasopara Railway Station) दिवसाढवळ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत अपहरण झालेल्या मुलाच्या आई-वडीलांनी पोलिसांकडे (Police) तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

नालासोपारा (Nalasopara) रेल्वे स्थानकमधील फलाट क्रमांक ४ वरती एक चिमुकला खेळत असताना त्याच्या आई-वडिलांपासून लांब गेला. हा चिमुकला भरकटेला पाहून रेल्वे स्थानकावरील एका दाम्पत्याने या मुलाशी गोड-गोड बोलत जवळीक साधली आणि त्याला रेल्वे स्थानकामधून बाहेर घेऊन गेले.

पाहा व्हिडीओ -

या मुलाचं अपहरण करतानाची सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या लहान मुलाच्या आई-वडीलांनी वसई लोहमार्ग पोलीसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी स्थानकातील CCTV तपासले असता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. तर चिमुकल्याचं अपहरण करणाऱ्या दाम्पत्याचा तपास वसई लोहमार्ग पोलीस करत आहेत. दरम्यान, प्रवासादरम्यान आपल्या लहान मुलांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com