Crime News
Crime NewsSaam TV

Mumbai Crime : मुंबई पोलिसांच्या रडारावर असलेल्या कुर्ल्यातील 'त्या' तीन बहिणींना अटक

गुन्हे शाखेने त्यांच्याकडून चोरीच्या 4 सोन्याच्या अंगठ्या, 4 मोबाईल फोन आणि 24 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
Published on

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईतील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याची उकल करताना गुन्हे शाखा युनिट-12 ने कुर्ला (Kurla) परिसरातून तीन सख्ख्या बहिणींना अटक केली आहे. ज्यांच्यावर मुंबईतील (Mumbai) विविध पोलीस ठाण्यात चोरीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही बहिणी अतिशय हुशार असल्याचं म्हटलं जातं. ते दिवसाढवळ्या निर्जन वसाहतीत घुसून चोरी करून पळून जात असता.

Crime News
Accident News : मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस वेवर भीषण पघात, तीनजण गंभीर जखमी

गुन्हे शाखेने त्यांच्याकडून चोरीच्या 4 सोन्याच्या अंगठ्या, 4 मोबाईल फोन आणि 24 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. सुजाता, सारिका आणि मिना अशी अटक केलेल्या तीन बहिणींची नावे आहेत.

सीसीटीव्हीवरून चोरी उघड

29 नोव्हेंबर रोजी कस्तुरबा पोलीस ठाण्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 20 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या परिसरात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही स्कॅन करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये तिन्ही संशयित महिला दिसल्या, तेव्हा घरात घुसून चोरी करणाऱ्या याच महिला असल्याचे निष्पन्न झाले. कॅमेऱ्यात दिसणारी महिला ऑटोरिक्षात बसताना दिसत होती. पोलिसांनी सदर रिक्षा ताब्यात घेतली. माहिती काढल्यानंतर त्या महिलेचा ठावठिकाणा लागला.

Crime News
FIFA World Cup : आतापर्यंत दोनदा चोरीला गेली फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी; 'असा' झाला उलघडा

त्या तिघी चोर बहिणी कुर्ल्याच्या

माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सपोनि रासकर, मपोउनी शेख, पोह बागवे, मपोह पाटील यांच्या पथकाने त्या महिलांना कुर्ला परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. तिघांनाही अटक केल्यानंतर कस्तुरबा पोलिसांच्या स्वाधीन करून जप्त केलेले दागिने आणि पैसेही त्यांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या महिला आरोपींविरुद्ध वनराई, विक्रोळी, मुलुंड, डोंबिवली, जुहू, सांताक्रूझ, कांदिवली, घाटकोपर आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल आहेत, तपासात या चोरट्या महिला सख्ख्या बहिणी असून कुर्ल्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com