लोकलचा पास देतात, मग तिकीट द्यायला काय हरकत आहे? - आ. राजू पाटील
लोकलचा पास देतात, मग तिकीट द्यायला काय हरकत आहे? - आ. राजू पाटीलSaam Tv News

लोकलचा पास देतात, मग तिकीट द्यायला काय हरकत आहे? - आ. राजू पाटील

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुंबई लोकलबाबत सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. लोकलचा पास देतात, मग तिकीट द्यायला काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
Published on

मुंबई : कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेणाऱ्यांना १५ ऑगस्टपासून लोकलने (Mumbai Local Train) प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र लोकलने प्रवास करण्यासाठी रेल्वेकडून केवळ पास (Mumbai Local Train Pass) देण्यात येतोय तिकीट (Mumbai Local Train Ticket) देण्यात येत नाही, त्यामुळे ज्यांना कधीतरीच प्रवास करायचा आहे अशांनीही पास काढायचा का असा प्रश्न निर्माण झालाय. याबाबत मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी सरकारला सवाल केला आहे. (They give a Mumbai local pass, so what's the problem to giving a ticket? - MLA Raju Patil)

हे देखील पहा -

आमदार राजू पाटील यांनी ट्विट केलं की, ''दोन डोस घेतलेल्यांना समजा महिन्यात २ वेळा २ स्टेशन जायचे झाल्यास महिनाभराचा पास काढावा ? मोलमजूर, व्यापारी, ज्येष्ठ नागरीक, तातडीच्या कामांसाठी जाणारे नागरीक सरकारला दिसत नाहीत का ? हे कसले नियोजन ? पास देतात तसेच तिकिट पण द्यायला काय हरकत आहे ?'' आमदार राजू पाटील यांनी सरकारच्या नियोजनावर टीका करत मुंबई लोकलचे तिकीट सुरु करण्याची मागणी केली आहे.

लोकलचा पास देतात, मग तिकीट द्यायला काय हरकत आहे? - आ. राजू पाटील
कोरोना लसींचे दोन्ही डोस पूर्ण करण्यात महाराष्ट्र ठरला अव्वल

सध्या लसीचे दोन डोस पुर्ण असलेल्यांना लोकल प्रवासासाठी पास मिळत आहे. मात्र ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहे पण त्यांना लोकलने दररोज प्रवास न करता कधीतरीत प्रवास कारायचा आहे अथवा दैनंदिन प्रवासाच्या स्टेशनपेक्षा इतर दुसऱ्या स्टेशनवर प्रवास करायचा आहे अशांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित होतोय. शिवाय महिन्यातून एक - दोन वेळा प्रवास कारायचा असल्यास पुर्ण महिन्याचा पास काढायचा का असा प्रश्नही सर्वसामान्य मुंबईकरांना पडला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com