पुणे : लोणावळ्यामधील Lonavla पर्यटनस्थळी Tourist spot कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आले आहे. ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास सक्त मनाई आहे. वाहनांना धबधब्यापासून १ किलोमीटर परिसरात बंदी घालण्यात आली आहे. लोणावळ्यामधील पर्यटनस्थळी मागील काही दिवसांपासून नागरिक गर्दी करत असल्याच दिसून येत आहे. The weekend is full of touristsdvj97
उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी वारंवार आवाहन करूनसहित नागरिक गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लोणावळ्यामधील भुशी धरण Bhushi Dam तुडुंब भरले आणि पायऱ्यांवरून पाणी ओसंडून जोरात वाहू लागले आहे, असे म्हणताच हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होताना दिसून येत आहेत. हाच प्रत्यय दरवर्षी दिसून येत आहे.
हे देखील पहा-
दरम्यान, पर्यटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी येण्यास सक्त मनाई केली आहे. पण, नियमांची एैशी- तैशी करून, पर्यटक लोणावळ्यामधील पर्यटनस्थळी पोहचताना दिसून येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली, पण तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. The weekend is full of touristsdvj97
पण, त्यांच्या या आवाहनांकडे दुर्लक्ष करून, नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे बघायला मिळात आहे. लोणावळ्यामध्ये शनिवार आणि रविवार या दिवशी तर हजारो पर्यटक दाखल होताना दिसून येत आहेत. लोणावळ्यामधील पर्यटनस्थळी याच पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आले आहे. प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून, नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी देखील केले आहे.
दरम्यान भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, धरण या ठिकाणी १ किलोमीटर परिसरात हे नियम लागू करण्यात आले आहे.The weekend is full of touristsdvj97
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.