The Kashmir Files:'द काश्मिर फाईल्स'ने 200 कोटींचा टप्पा केला पार

काश्मिर फाइल्सने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आणखी एक मोठा विक्रम केला आहे.
The Kashmir Files
The Kashmir FilesSaam Tv
Published On

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाची देशात जेवढी चर्चा झाली बॉक्स ऑफीसवर तेवढाच दबदबा या चित्रपटाचा (Film) राहिला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. चित्रपटगृहे अजुनही हाऊसफुल आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रोज नव नवे रेकॉर्ड बनवत आहे. 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपटाने 13 व्या दिवशी 200 करोड पार पोहचून नवा विक्रम केला आहे.

चित्रपट तज्ञ तरण आदर्श यांनी 'द काश्मीर फाइल्स' बद्दल एक ट्विट (Tweet) केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी 'बॉक्स ऑफिसवर 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार करण्याची आणि एक मोठा रेकॉर्ड बनवल्याची माहिती शेअर केली आहे.

The Kashmir Files
Kashmir Files : "केंद्रात भाजपचं सरकार असल्यानंच काश्मीर फाईल्स रिलीज करता आला", विवेक अग्निहोत्री

'#TheKashmirFiles 200 कोटी कमावले. याशिवाय या चित्रपटाने अक्षय कुमारच्या #सूर्यवंशी या लाइफटाईम कलेक्शनचा टप्पाही पार केला आहे. 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा महामारीच्या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 200.13 कोटींची कमाई केली आहे. अस ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.

तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत येणार

या (The Kashmir Files) चित्रपटाने अनेक विक्रम केले आहेत. बॉलिवुडच्या (Bollywood) इतिहासात असा चित्रपट पहिल्यांदाच तयार झाल्याचे बोलले जात आहे. 11 मार्चला रिलीज झालेला 'द काश्मीर फाइल्स' फक्त 14 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात स्पायडर मॅन, सूर्यवंशी आणि इतर 83 चित्रपटांना मागे टाकले आहे. याशिवाय चित्रपटाचे यश पाहून चित्रपट निर्मात्यांनी तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या अन्य चार प्रादेशिक भाषांमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com