मुंबई : मुंबईत थेट दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट Lift खाली कोसळल्याची घटना घडली आहे या लिफ्टमध्ये तीन वर्षाच्या लहाणग्यासह अन्य चार जण होते, सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहाणी झाली नसून सर्व जखमींवरती भायखळा येथील जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भायखळा येथील जे.जे मार्गावरील कॅफे पॅराडाईज (Cafe Paradise) शेजारील खाडिया रस्त्यावर असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (SRA) ही 18 मजल्यांची इमारत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे देखील पहा -
तसेच लिफ्ट बिघडल्यामुळे लिफ्ट थेट दहाव्या मजल्यावरून खाली कोसळल्याचीही माहिती देण्यात आली आहे. लिफ्ट खाली पडल्याची घटना घडताच इमारतीमधील नागरिकांनी अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला (Mumbai Police Control Room) माहिती दिल्याने या लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांची सुटका करण्यात आली.
जखमी झालेल्यांमध्ये हुमा खान वय 24, अर्शा खान वय 7, सोहन कादरी या लहणग्याचे वय 3 वर्ष आहे, निलोफर रिझवान शेख (36) आणि शाहीन खान (45) यांचा पाच रहीवाशांचा समावेश असून या सर्वांवरती जेजे रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पाचांतील एकाला डिस्चार्ज दिल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. मात्र या घटनेत शाहीन खानच्या पायांमध्ये फ्रॅक्चर असून त्यावरती शस्त्रक्रिया Surgery करण्यात आल्याची माहिती जे जे रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागातील डॉ. नादिर शाहनीं दिली. दरम्यान जे जे मार्ग पोलिसांनी कलम 287 नुसार (मशिनरीच्या बाबतीत निष्काळजीपणा) तसेच 338 (इतरांच्या जीवाला, वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यामुळे गंभीर दुखापत करणे) याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.