Thane Traffic Police : नंबर प्लेट गंजलेली, हेल्मेट नाही; ठाण्याच्या तरूणाने वाहतूक पोलिसाला विचारला जाब, व्हिडिओ व्हायरल

Thane Police Break Rule : ठाण्यात वाहतूक पोलिसांनीच वाहतुकीचे नियम मोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस हेल्मेटशिवाय आणि पुसट नंबरप्लेट असलेली गाडी चालवत होते. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी संबंधित पोलिसांवर कारवाई केली आहे.
Thane Traffic Police : नंबर प्लेट गंजलेली, हेल्मेट नाही; ठाण्याच्या तरूणाने वाहतूक पोलिसाला विचारला जाब, व्हिडिओ व्हायरल
Thane Police NewsSaam Tv
Published On
Summary

ठाण्यातील वाहतूक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्याचे उघड

हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे आणि पुसट नंबरप्लेट असलेली गाडी पाहून नागरिकांनी पोलिसांना रोखले

पोलिसांनी “ही गाडी आमची नाही” असा खुलासा केला

ठाणे पोलिसांनी संबंधित पोलिसांवर कारवाई केली असल्याचे सांगितले

वाहतुकीचे नियम पाळा नाहीतर दंड ठोठावला जाईल. अशाप्रकारच्या सूचना वाहतूक पोलीस आपल्याला नेहमीच देतात. आणि त्याचे काटेकोर पालन देखील करून घेतात. पूर्वी ही कारवाई वाहतूक पोलिसांना कठीण जायची मात्र आता डिजिटल तंत्रज्ञानामुळे गाडीचा एक फोटो काढून चालकावर कारवाई केली जाते. मात्र हे नियम फक्त सर्वसामान्यांपुरतेच मर्यादित आहेत का ? हे नियम पोलिसांना लागू नाहीत का ? असे प्रश्न पडण्यासारखा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हिडिओमध्ये चित्रित झाल्याप्रमाणे, मुंबईतील ठाण्यात एका दुचाकीवरून जाणाऱ्या वाहतूक पोलिसांचा पाठलाग करून तरुणांनी त्यांना रस्त्यात रोखल. त्यानंतर त्यांनी पोलिसांना गाडीवरून खाली उतरवलं. या तरुणांनी आरोप केला आहे की, पोलिसांच्या गाडीवरली नंबरप्लेट ही पुसट होती त्याचे नंबर दिसत नव्हते. हा प्रकार लक्षात येताच तरुणांनी मिळून वाहतूक पोलिसांचा भांडाफोड केला.

Thane Traffic Police : नंबर प्लेट गंजलेली, हेल्मेट नाही; ठाण्याच्या तरूणाने वाहतूक पोलिसाला विचारला जाब, व्हिडिओ व्हायरल
Shocking News : कंपनी मॅनेजरची कर्मचारी महिलेवर वाईट नजर, बलात्कार करून खंडणी उकळली, बायकोचीही नवऱ्याला साथ

आरटीओच्या नियमांनुसार हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. मात्र या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरलं नसल्याचं दिसून येत आहे. तरुणांनी या प्रकरणाचा जाब विचारला असता पोलिसांनी "ही गाडी आमची नाही,आम्ही ती जप्त करण्यासाठी इथे आणली आहे" असं म्हटल्याचं व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर ठाणे पोलिसांनी संबंधित पोलिसांवर कारवाई केल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी सांगितले की, "व्हायरल व्हिडिओमध्ये वादात सहभागी असलेल्या दोघांपैकी एक व्यक्ती हेल्मेटशिवाय मोटारसायकल चालवताना आढळली, ज्यामुळे नियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान कायद्याचे रक्षकच अशाप्रकारे नियम धाब्यावर बसवत असतील तर सर्व सामान्यांकडून काय अपेक्षा करावी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com