Thane News : पावसाने झोडपले, तरीही ठाणेकरांवर पाणी कपातीचं संकट, शनिवारी कोणत्या भागात पाणीबाणी?

Thane water cut News : शनिवारी ठाण्यात २४ तास पाणी कपात होणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असून पुढील २-३ दिवस कमी दाबाने पाणी येणार आहे.
water cut News
Water supply Saam TV News Marathi
Published On

विकास काटे, ठाणे प्रतिनिधी

Thane 24-hour water cut News Update : पावसाने झोडपलेय तरीही ठाणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावलेय. शनिवारी ठाण्यातील अनेक भागात पाणीबाणी असल्याची माहिती ठाणे मनपाकडून देण्यात आली आहे. जलवाहिनीच्या कामासाठी ठाणे मनपाकडून २४ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणेकरांना पुढील दोन दिवस पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. कारण, जलवाहिनीचे काम झाल्यानंतरही पुढील दोन ते तीन दिवस पाणी कमी दाबाने येणार आहे. (Thane pipeline replacement work schedule)

कोणत्या भागात पाणी कपात होणार ? Thane 24-hour water cut areas list

शनिवारी असलेल्या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेतंर्गत इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ, कैलासनगर रेनो टँक, रुपादेवी जलकुंभ, रुपादेवी रेनो टँक, रामनगर जलकुंभ, येऊर एअर फोर्स जलकुंभ, लोकमान्य जलकुंभ अंतर्गत येत असलेल्या सर्व भागातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती ठाणे मनपाकडून देण्यात आलेली आहे.

water cut News
Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

शनिवारी ठाण्यात पाणीकपात का? Why water supply is cut in Thane Saturday

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे पाणी पुरवठा करण्यासाठी नव्याने अंथरण्यात आलेले 116‍8 मि.मी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी नितिन कंपनी जंक्शन येथे 750मि.मी व्यासाच्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करणे आवश्यक असल्याने शनिवारी सकाळी 9.00 ते रविवारी सकाळी 9.00 वाजेपर्यत २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

water cut News
Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

ठाणे मनपाकडून काय सांगण्यात आले ?- Thane Municipal Corporation water advisory

जलवाहिनीच्या दुरूस्तीच्या कामामुळे ठाण्यातील काही भागात २४ तास पाणी कपात करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाणी कपातीच्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

water cut News
Tamhini Ghat Accident : काळाचा घाला! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, सनरुफ तोडून दगड कारमध्ये पडले, महिलेचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com