Thane Election: मोठी बातमी! ठाण्यात मविआ फुटली, काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Mahavikas Aghadi: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड घडली. महाविकास आघाडीमध्ये फूट पडली. काँग्रेसने मविआमधून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी याबबत घोषणा केली.
Thane Election: मोठी बातमी! ठाण्यात मविआ फुटली, काँग्रेसचा स्वबळाचा नारा
Thane mahavikas aghadiSaam tv
Published On

Summary -

  • ठाणे महापालिका निवडणुकीआधी मविआत मोठी फूट पडली

  • काँग्रेसने मविआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

  • जागावाटपाचा तिढा न सुटल्याने काँग्रेस पक्ष मविआतून पडला बाहेर

  • काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार

विकास काटे, ठाणे

ठाणे महानगर पालिका निवडणुकीच्या रणांगणात महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. ठाण्यात मविआ फुटली असून काँग्रेसने मविआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ठाण्यात काँग्रेस स्वबळावर महापालिका निवडणूक लढणार आहे. ⁠काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी याबबत घोषणा केली.

ठाण्यामध्ये मविआमध्ये जागा वाटापावरून वाद झाला. त्यामुळे काँग्रेसने नाराज होत मविआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. दिलेल्या जागा मान्य नसल्याने आणि शिवसेनेने मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. ⁠'आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निवडणूक लढणार आहोत. ⁠मला स्वबळावर लढण्यास भाग पाडले.', असे मत विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केले.

Thane Election: मोठी बातमी! ठाण्यात मविआ फुटली, काँग्रेसचा स्वबळाचा नारा
BMC Election : मुंबईतून पहिली बंडखोरी! मनसे नेत्या अनिशा माजगावकर अपक्ष निवडणूक लढवणार

हमे तो अपनो ने लुटा गैरोने नही असे म्हणत विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, '⁠आम्ही ३५ जागा मागितल्या होत्या. ⁠पण २० जागांवर आम्ही मागणी केली. ⁠पण ते जागा सोडायला तयार नव्हते. ⁠मी माझी उमेदवारी सोडायला तयार झालो होतो. ⁠आम्ही ३ वेळा लेखी प्रस्ताव दिले होते. ⁠⁠उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ⁠अडचणीते असताना मी जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांना मदत केली तेच आज आमच्या जिवावर उठले. मनसेला एक- एका प्रभागात २-२ जागा आणि काँग्रेसला नाही.'

Thane Election: मोठी बातमी! ठाण्यात मविआ फुटली, काँग्रेसचा स्वबळाचा नारा
BMC Election: आधी स्वबळाची घोषणा, ऐनवेळी वंचितशी युती; BMCसाठी काँग्रेसला का हवी आंबेडकरांची साथ,नव्या आघाडीची रणनीती काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com