एकनाथ शिंदेंचं ठाण्याला गिफ्ट; पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार, तिकीट दर किती असणार?

tmt electronic double decker bus : एकनाथ शिंदेंनी ठाण्याला आणखी गिफ्ट दिलं आहे. ठाण्यात पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार आहे.
tmt bus news
tmt bus Saam tv
Published On

ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

इलेक्ट्रिक डबल डेकर बसमधून ९० प्रवासी प्रवास करू शकतात.

डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ठाण्यात आजपासून इलेक्ट्रिक डबल डेकर बस सेवेत दाखल झाली आहे. इलेक्ट्रिक डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास आणखी सुकर आणि आरामदायी होणार आहे. या बसच्या लोकार्पणाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित ठाण्याच्या महापौर देखील उपस्थित होत्या.

ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास या डबलडेकर बसमधून केलाय. नव्या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असल्याचे शिंदेंनी सांगितले.

tmt bus news
मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट! ठाणे, भिवंडी, कल्याणमधील प्रवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा

नव्या बसचा भार परिवहन सेवेवर नाही

बसच्या लोकार्पणावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जी.सी.सी तत्वावर या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार आहेत. या बसचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नसल्याचे सांगण्यात आलंय.

या डबलडेकर बसमध्ये एकाचवेळी 65 प्रवासी बसू शकतात. तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. सद्यस्थितीत ही बस तीन हात नाका ते गायमुख या मार्गावर धावणार आहे. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच ठाण्यातील परिवहन ताफ्यात आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार आहेत.

tmt bus news
शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

बसच्या तिकीटाचे दर जुनेच

तत्पूर्वी, ठाणेकरांच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत इलेक्ट्रिक डबलडेकर बसची भर पडली आहे. या बससाठी जुनेच दर असणार असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com