Thane News: फी न भरल्याने विद्यार्थी वर्गाबाहेर, ठाण्यातील धक्कादायक प्रकार; संतप्त पालकांचा शाळेत राडा

Thane News: ठाण्यातील वर्तक नगर येथील शाळेत विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून वर्गातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Thane News
Thane NewsSaamtv

Thane Breaking News:

ठाण्यातील वर्तक नगर येथील लिटल फ्लॉवर शाळेत विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून वर्गातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेत गोंधळ घातला. यावेळी शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शैक्षणिक फी न भरल्याने विद्यार्थ्यांना परिक्षेस बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यामधून (Thane) समोर आला आहे. ठाण्याच्या वर्तकनगर भागातील लिटिल फ्लावर शाळेत हा प्रकार घडला. याबाबतची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेत शाळा प्रशासनाला याबाबत जाब विचारला.

यावेळी अनेक पालकांनी फी भरून देखील शाळेने विद्यार्थ्यांना परीक्षेत बसून दिले नसल्याचा गंभीर आरोप शाळा प्रशासनावर करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी देखील शाळेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार केली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Thane News
Talathi Exam : तलाठी भरती परीक्षा रद्द करा; स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक

या संपूर्ण प्रकारानंतर संतप्त पालकांकडून शाळा प्रशासनाला धारेवर धरत या प्रकरणी जाब विचारला. पालक आणि शिक्षकांमध्ये झालेल्या वादामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या प्रकरणी शिवसेना युवा सेनेचे नेते पूर्वेस सरनाईक यांनी शाळा प्रशासनाची भेट घेत पालकांच्या आरोपावर जाब विचारला. (Latest Marathi News)

Thane News
Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती; मुंबईत धडकण्याआधीच आरक्षणावर तोडगा निघणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com