Thane Lift Collapse Today: ठाण्यातील इमारत लिफ्ट दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर; घटनास्थळाची सध्याची परिस्थिती काय?

Thane Lift Collapse Today: ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ६ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Thane Lift Collapse Today
Thane Lift Collapse TodaySaam tv
Published On

Thane Lift Collapse Today:

ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ६ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील मृतांची नावे समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

ठाण्यातील बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेतील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Thane Lift Collapse Today
Raju Patil: कल्याणमधील खासदार डॉक्टर आहेत, मात्र...; महिला प्रसुती प्रकरणावरून राजू पाटील यांची नाव घेता श्रीकांत शिंदेंवर टीका

घटनास्थळी परिस्थिती काय होती?

इमारतीची लिफ्ट कोसळल्यानंतर घटनेतील मृत कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत ६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार जखमी अवस्थेत आहे.

या घटनेतील जखमी कामगाराला उपचाराकरिता ठाण्यातील निपुण रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच कामगारांचे मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील कार्यवाहीकरिता पाठविण्यात आले आहे.

ठाण्यातील या दुर्घटनेत मृत झालेल्या कामगारांची नावे समोर आली आहेत. महेंद्र चौपाल (पु / वय ३२ वर्षे ), रुपेश कुमार दास (पु / वय २१ वर्षे ), हारून शेख (पु / ४७ वर्षे ), मिथलेश (पु / ३५ वर्षे ) ,कारिदास (पु / ३८ वर्षे ), अज्ञात (पु) अशी नावे समोर आली आहेत.

तसेच या दुर्घटनेत सुनिल कुमार दास (पु / वय २१ वर्षे ) हा कामगार जखमी झाला आहे. त्याच्यावर ठाण्यातील निपुण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Thane Lift Collapse Today
Maratha Andolan: मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; मनोज जरांगेंनी केली कळकळीची विनंती, म्हणाले...

दुर्घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, बाळकुम येथील रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीचं बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होतं. वॉटरप्रूफिंगचे काम संपलं. त्यानंतर या इमारतीच्या लिफ्टने आठ मजूर खाली येत होते. त्यावेळी लिफ्टचा दोर तुटला. त्यानंतर हा मोठा अपघात घडला, असं सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com