मुंबई आणि ठाण्याला जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. या प्रकल्पातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत भुयारी मार्गाच्या सहाय्याने ठाणे आणि बोरिवली दरम्यानचे अंतर कमी होणार आहे.
या प्रकल्पासाठी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या २२ व्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)
मुंबई जिल्ह्याच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली आणि ठाणे जिल्ह्याला भूमिगत मार्गाने जोडणाऱ्या सदर प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये १०.२५ किमीचा बोगदा असणार आहे. तसेच या मार्गात १.५५ किमीचा पोहचमार्ग असेल. तसेच १३.०५ मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे १२ किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे. या प्रकल्पात आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या बोगद्याच्या दोन्ही बाजूस २+२ मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक ३०० मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज असणार आहे.तसेच प्रत्येक २ पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे.
प्रकल्पातील बोगद्यांचे बांधकाम हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येईल. तर चार टनल बोरिंग मशिनच्या मदतीने करण्यात येणार आहे. सुमारे १२ किमी लांबीच्या प्रकल्पातील ४.४३ किमी लांबीचा बोगदा हा ठाणे जिल्ह्यात असेल. तर ७.४ किमी लांबीचा बोगदा हा बोरीवलीमधून प्रस्तावित आहे.
प्रकल्पातील या बोगद्यांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याची नाळी, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे संकेत फलक लावण्यात येईल. तसेच NFPA502 च्या तरतुदींनुसार बोगद्यात नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशी वायुविजन प्रणालीही उभारली जाणार आहे. प्रकल्पाची किंमत ही सुमारे रुपये १६६०० कोटी आहे. त्यामध्ये जमीन अधिग्रहणाच्या खर्चाचा ही समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.